Churchill Alemao And Walanka Alemao Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier: फ्रान्सिस झेवियर यांच्या DNA चाचणी मागणीचा वाद पेटला, माजी मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांत तक्रार

Colva News: झेवियर यांच्या आगामी अवेशष प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक हिंसाचार निर्माण करण्याचा प्रयत्न वेलिंगकर यांनी केला आहे; चर्चिल आलेमाव.

Pramod Yadav

कोलवा: हिंदू रक्षा महाआघाडीचे सुभाष वेलिंगकर यांनी फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डिएनए चाचणी करण्याची मागणी केलीय. यावरुन गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी थेट पोलिसांत धाव घेत, वेलिंगकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, कारवाईची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत वालांका आलेमाव देखील उपस्थित होत्या.

गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्यांना आंदरांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रम हिंदू रक्षा महाआघाडीच्या आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुभाष वेलिंगकरांनी फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डिएनए चाचणी करण्याची मागणी केली. यावरुन राज्यातील कॅथलिक समाज आक्रमक झाला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव आणि त्यांची कन्या वालांका आलेमाव यांनी वेलिंगकर यांच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. आलेमाव यांनी कोलवा पोलिसांत सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

झेवियर यांच्या आगामी अवेशष प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक हिंसाचार निर्माण करण्याचा प्रयत्न वेलिंगकर यांनी केला आहे. वेलिंगकरांचा हा व्हिडिओ तात्काळ समाज माध्यमांवरुन हटवावा आणि त्यांच्याविरोधात कारवाई करावी अन्यथा राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी मागणी आलेमाव यांनी तक्रारीद्वारे केलीय.

सुभाष वेलिंगकर यांनी यापूर्वी देखील झेवियर यांच्याविरोधात वक्तव्य करुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. 'गोंयचो सायब हा गोंयचो सायब नाही', असे वक्तव्य वेलिंगकरांनी केले होते. याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती, पण पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे आलेमाव यांनी तक्रारीत म्हटले आहे.

वेलिंगकर गोव्यातील लोकांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करत असून, त्यांना भडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वेलिंगकरांनी केला. संत झेवियर यांच्या पवित्र अवशेषांना मृतदेह म्हणून आणि त्यांच्या डिएनए चाचणीची मागणी करुन, वेलिंगकरांनी धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आलेमाव यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT