Hill Cutting  Dainik Gomantak
गोवा

Hill Cutting : जुनसवाडा मांद्रेत डोंगरकापणीवर कारवाई करा

स्वराज संस्था: झाडांची कत्तलही रोखण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

मांद्रे पंचायत क्षेत्रातील जुनस वाडा आम्रपाली प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर डोंगर कापणी आणि झाडांची कत्तल केली जात आहे. त्यावर नगर आणि नियोजन खात्याने तातडीने लक्ष घालून डोंगर कापणी करणाऱ्या वर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्वराज्य संस्था मांद्रे 28 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी संस्थेचे निमंत्रक ॲड. प्रसाद शहापूरकर, कार्यकारी अध्यक्ष जगन्नाथ पार्सेकर, सदस्य शंकर गोवेकर ,सदस्य तुषार गोवेकर व आग्नेल फर्नांडिस उपस्थित होते.

शंकर गोवेकर यांनी सांगितले की, डोंगर कापणी आणि व्हीला उभारणी भविष्यात जूनसवाडासाठी धोकादायक ठरू शकते. डोंगर माळरानावरून येणारे पाणी थेट लोकवस्तीत घुसून हाःहाकार माजेल,अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

जुनस वाडा मांद्रे या ठिकाणी ज्या पद्धतीने डोंगर कापणी चालू आहे, पंचायतीने त्याचा पंचनामा केलेला आहे. ‘टीसीपी’ने परवाने दिले, त्याहीपेक्षा जास्त डोंगर कापणी झालेली आहे. या संदर्भात आम्ही तक्रारदार म्हणून मांद्रे पंचायत क्षेत्रातील डोंगर कापणीची चौकशी आणि पूर्ण माहिती टीसीपी विभागात जाऊन मिळवणार आहे - ॲड.प्रसाद शहापूरकर, निमंत्रक स्वराज्य संस्था

सरपंच अमित सावंत हे ॲक्टिव्ह आहेत. आणि त्यांच्याकडून मांद्रेवासीयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. प्रकल्पामुळे ग्रामस्थांना त्रास होणार नाही. यावर अगोदर पंचायतीने विचार करावा. एखाद्या प्रकल्पाला परवाना देताना जनतेच्या प्रश्नांची उत्तरे आणि त्यांचे समाधान करण्यासाठी काम करावे.

-जगन्नाथ पार्सेकर, स्वराज्य संस्था

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT