Sal Shiv Jayanti  Dainik Gomantak
गोवा

Sal Shiv Jayanti : शिवरायांप्रमाणे संकल्प तडीस न्या : प्रिया राऊत

Sal Shiv Jayanti : यावेळी महादेव भूमिका देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत व समाजसेवक विशाल परब उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Sal Shiv Jayanti :

साळ, छत्रपती शिवाजी महाराजासारखे संकल्प करून ते तडीस नेण्यास कार्यक्षम असावे. प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील एखादा जरी गुण अंगीकारला तर आपले जीवन धन्य होईल, असे विचार शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या चेअरमन प्रिया राऊत यांनी व्यक्त केले.

साळ येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भूमिका मंदिराच्या प्रांगणातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रिया राऊत व शैलेश राऊत यांनी कुंकुमतिलक लावून पुष्पहार अर्पण केला. यावेळी महादेव भूमिका देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत व समाजसेवक विशाल परब उपस्थित होते.

तत्पूर्वी पांडुरंग परब यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी शैलेश राऊत,सचिन राऊत व रुद्रेश नाईक यांनी घोषणा देत सारा परिसर दुमदुमून सोडला. यावेळी स्वामी विवेकानंद कला उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष दिलीप देसाई, मुकुंद परब, पांडुरंग परब, प्रमोद राऊत, शिक्षिका गीता राऊत, सोनल परब, प्रशिला परब,

अर्जुन परब, सखाराम परब, कालिदास राऊत व विद्यार्थी उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता व सजावट हर्ष देसाई, दिलीप देसाई, धीरज परब, संजय परब, दिवाकर बायकर यांनी केली. निकीता बायकर व समृद्धी देसाई यांनी चौथऱ्या सभोवती रांगोळी सजावट केली होती.

माजी मंत्री कै. पांडुरंग राऊत (भाई ) यांच्यामुळे येथील जनसामान्यांत शिवाजी महाराजांची जयंती कार्यक्रम आणि छत्रपतींच्या गुणांची ओळख निर्माण झाली, असे देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत यांनी यावेळी सांगितले. यावेळी देवस्थान सचिव विशाल परब यांनीही विचार मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT