Goa News : गोव्याचा उत्कर्ष हाच ‘गोमन्तक’चा ध्यास : राजू नायक

Goa News : कुडचडे येथील वाचक मेळाव्याला प्रतिसाद, कार्यशाळा घेण्याची सूचना
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News :

केपे, ‘गोमन्तक’ गोव्यातील सर्वात जुने वर्तमानपत्र असूनही या वर्तमानपत्राने आपली जुनी परंपरा कायम ठेवतानाच वाचकांच्या अभिरुची प्रमाणे नवे बदलही वाचकांसमोर आणले आहेत.

त्यामुळेच ‘गोमन्तक’ हे राज्यातील एकमेव परिपूर्ण असे वर्तमानपत्र बनले असल्याचे कुडचडे येथील वाचकांनी व्यक्त केले.

‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी यावेळी वाचकांशी संवाद साधला. ते म्हणाले, गोव्याचा उत्कर्ष आणि गोव्याच्या संस्कृतीचे जतन हेच ‘गोमन्तक’ने आपले अंतिम उद्दिष्ट मानले असून तेच ब्रीद डोळ्यांसमोर ठेवून हे वृत्तपत्र आपली वाटचाल करीत आहे.

यावेळी ‘गोमन्तक’चे व्यवस्थापक सचिन पोवार आणि वितरण व्यवस्थापक जयदीप पवार हे उपस्थित होते.

‘गोमन्तक तुमच्या दारी’ या उपक्रमाखाली कुडचडे येथील न्यू एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये वाचक मेळावा आयोजित केला होता.

त्या मेळाव्याला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोव्यात ‘गोमन्तक’ सुरू झाल्यापासून आजपर्यंत या पत्राचे वाचक असलेल्या काही ज्येष्ठ वाचकांनीही या मेळाव्याला हजेरी लावली होती.

यावेळी सावर्डेचे पंच संजय नाईक, माजी नगरसेवक पुष्कल सावंत, माजी पत्रकार वामन वैद्य, अनिल सावंत देसाई, नारायण प्रभुदेसाई, प्रकाश खरंगटे, दर्शनी सावंत देसाई यांनीही आपले विचार मांडले. भरत पवार यांनी सूत्रसंचालन केले.

Goa
Goa Mine: खोट्या ईआयए अहवालाविरुद्ध ग्रामस्थांचा एल्गार; 'खाण ब्लॉकसाठीची जनसुनावणी रद्द करा'- ग्रामस्थांची मागणी

वाचक काय म्हणाले...

‘गोमन्तक’ने अगदी पहिल्या अंकापासूनचे वाचक असलेले शैलेश संजगिरी यांनी यापूर्वीचे ‘गोमन्तक’चे संपादक माधवराव गडकरी आणि नारायण आठवले यांची आठवण काढत आताचे संपादक राजू नायक हेही त्याच धडाडीने काम करीत आहेत.

आजकालच्या वर्तमानपत्रातून चांगले संपादकीय लेख वाचायला मिळत नाहीत, पण ‘गोमन्तक’ याला अपवाद आहे. ‘गोमन्तक’मधून वेगवेगळे प्रसिद्ध होणारे लेख वाचनीय असतात, असे आशिष करमली यांनी सांगितले.

आजपर्यंत ‘गोमन्तक’ला चांगले संपादक लाभले आहेत व आता राजू नायक यांच्या रूपात परत एकदा नावाजलेला संपादक मिळाला असून त्यांच्या या कार्यकाळात ‘गोमन्तक’ने भरारी मारली आहे असे प्रदीप काकोडकर यांनी सांगितले.

नवीन पत्रकार तयार करण्यासाठी ‘गोमन्तक’ने गोव्यातील शाळा शाळामध्ये जाऊन कार्यशाळा घ्याव्यात आणि प्रत्येक आठवड्याला एका शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेला मजकूर प्रसिद्ध करावा, अशी सूचना केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com