Tailoring Business in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ‘टेलरिंग’ व्यवसाय येतोय पूर्वपदावर

शिंपी कामात व्‍यस्‍त; शाळा सुरू झाल्‍यामुळे तब्‍बल दोन वर्षांनी मिळाले हातांना काम

दैनिक गोमन्तक

डिचोली : कोविड महामारीमुळे अडचणीत आलेला कपडे शिवण्‍याचा (टेलरिंग) व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. जवळपास दोन वर्षांनी डिचोलीतील बहुतांश शिंपी आता टेलरिंग व्यवसायात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. लग्नकार्ये आणि आता शाळाही सुरू झाल्याने ग्राहकांची पावले आता कपडे शिवून घेण्‍यासाठी शिंप्‍यांकडे वळू लागली आहेत. दरम्‍यान, शिलाईसाठी ग्राहक येत असले तरी कोविडची स्थिती नियंत्रणात राहिल्यास दोन वर्षांत झालेली आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी किमान एक वर्ष तरी प्रतीक्षा करावी लागणार, असे या शिंप्‍यांचे म्‍हणणे आहे.

डिचोली शहरात लहान-मोठे मिळून जवळपास पन्नास शिंपी आहेत. कोविडचा संसर्ग फैलावल्यानंतर टेलरिंग व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. लग्नकार्यांवर निर्बंध आले, त्यातच शाळाही बंद राहिल्याने कपडे शिलाईसाठी शिंप्‍यांना कोणी विचारतच नव्हते. परिणामी टेलरिंग व्यवसाय ठप्प झाला होता.

ग्राहक नसल्याने त्‍यांच्‍या आर्थिक कमाईचा स्रोत बंद झाला होता. कोविड काळात काही टेलरांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. ते आर्थिक अडचणीत सापडले होते. आधीच रेडिमेड कपड्यांचा जमाना, त्यातच कोविडचे संकट, यामुळे काही टेलर तर कर्जबाजारी झाले आहेत.

कोविडने हिरावला होता तोंडचा घास

कोविडची स्थिती नियंत्रणात आल्यानंतर हळूहळू लग्नकार्ये आदी समारंभ तसेच जत्रा, उत्सव पूर्वीप्रमाणे साजरे होऊ लागले आहेत. आता तर यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून शाळाही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे टेलरांना कपडे शिलाईचे काम मिळू लागले आहे. शहरातील बहुतांश टेलर सध्या शिलाईच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे ठप्प झालेल्‍या टेलरिंग व्यवसायला आता हळूहळू सुगीचे दिवस येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT