पणजी: फार्मगुडी येथे सुरू होत असलेल्या हॉटेल व्यवस्थापन आणि खानपान तंत्रज्ञान संस्थेचे संचालन करण्यासाठी गोवा पर्यटन आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संस्थेशी करार करणार आहे. केंद्र सरकारच्या अनुदानीत हा प्रकल्प दीड वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. (Goa Hotel Management Project Latest Update)
एका पर्यटन अधिका-यांनी सांगितले की, ते स्पष्ट आव्हानांसाठी संस्था स्वतः चालवू इच्छित नाहीत. “स्वित्झर्लंड-आधारित संस्थेची सूचना पर्यटन हितधारकांनी केली होती आणि आम्हाला बोर्डावर एक नावाजलेली संस्था हवी होती म्हणून आम्ही परदेशी संस्थेशी बोलणी सुरू केली,” पर्यटन अधिकारी म्हणाले. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी संस्थेशी करारावर स्वाक्षरी केली जाईल, जेणेकरून विलंब न करता लवकरात लवकर कार्यान्वित करता येईल. कराराच्या अटीप्रमाणे गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी ठराविक जागा राखीव ठेवाण्यात आल्या आहेत, फीमध्ये सवलत आणि स्थानिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महसूल वाटणीसाठी अटी जोडल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ते पुढे म्हणाले “आम्हाला प्रकल्पातून पैसे कमवायचे नाहीत.
गोव्यातील (Goa) विद्यार्थ्यांना लाभ मिळावा ही आमची योजना आहे. किचन ट्रेनिंगसह सर्व सुविधांची व्यवस्था करण्याची जबाबदारी संस्थेची असेल, असे ते म्हणाले.
केंद्राकडून राज्याला मिळालेल्या 300 कोटी रुपयांच्या हीरक महोत्सवी अनुदानांतर्गत या प्रकल्पाला 30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. "प्रकल्पाचे (Hotel Management) काम रुळावर आले आहे, आणि 12 ते 18 महिन्यांत पूर्ण होईल," ते म्हणाले. फार्मगुडी (Farmagudi) येथे पाककला प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची योजना सुमारे आठ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती आणि त्याची पायाभरणीही झाली होती. या प्रकल्पाला केंद्राकडून निधी मिळणार होता, परंतु त्याची प्रगती अनेक कारणांमुळे लांबणीवर पडली आणि शेवटी तो रद्द करण्यात आला. वर्षभरापूर्वी राज्य सरकारने या प्रकल्पाची पुन्हा सुरवात केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.