लुईझिन फालेरो यांच्यावर ममता दीदींची खप्पामर्जी

नवगठित राष्ट्रीय कार्यकारिणीत माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांना स्थान नाही.
Luizinho Faleiro
Luizinho FaleiroDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: तृणमूल काँग्रेसची गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांच्यावरील खप्पामर्जी स्पष्ट झाली आहे. पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलेल्या नवीन राष्ट्रीय समितीत फालेरो यांना स्थान दिलेले नाही. शिवाय काँग्रेसमधून तृणमूल पक्षात आलेल्या सुश्मिता देव आणि मुकुल संगमा यांनाही बाहेरचा रस्ता दाखविला आहे. (Goa News)

Luizinho Faleiro
छत्रपती शिवाजी महाराजांना मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून मानवंदना

नवीन कार्यकारिणीत यशवंत सिन्हा यांना वरिष्ठ उपाध्यक्ष तर सुब्रता बक्षी व चंद्रिमा भट्टाचार्य यांची नियुक्ती अन्य दोन उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे. तृणमूल पक्षात एक व्यक्ती एक पद हे तत्व नवीन समिती निवडताना लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ममता यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे खासदार असतानाही त्यांची वर्णी दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे सरचिटणीसपदी लावण्यात आली आहे.

गोव्यातील (Goa) तृणमूलकडून असे सांगण्यात आले की, फालेरो यांना पक्षामधूनच विरोध होता. नावेली सोडून अन्य कुठेही प्रचाराला जाऊ नका असे फालेरोंना कळवले. कारण कोणत्याही उमेदवाराला ते आपल्या प्रचारासाठी नको होते. वेळ्ळीतील बेंजामिन सिल्वा यांनीही फालेरो प्रचारासाठी नकोत असे सांगितले. शिवाय महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचेही फालेरोंशी मतभेद होते. एका बैठकीत ते उघड झाल्याची माहिती मिळाली.

Luizinho Faleiro
वास्कोत सेटबॅक जमिनीवर हॉटेलचे अवैध बांधकाम

मला डच्चू दिला ही माहिती चुकीची आहे. माझ्याकडे पद नसतानाही राष्ट्रीय कार्यकारिणीचा उपाध्यक्ष नेमण्यात आले. आज मी राज्यसभा खासदार आहे, हे कुणी विसरता कामा नये. आजच आमची कोलकात्यात बैठक झाली. आता मला कार्यकारी समितीवर स्थान देण्यात आले आहे. सुश्मिता देव आणि मुकुल संगमा हेही या समितीवर आहेत. - खा.लुईझिन फालेरो

तृणमूलच्याच एका ज्येष्ठ सदस्याने 'गोमन्तक'ला सांगितले की, फालेरो यांना चर्चचाही पाठिंबा मिळविता आला नाही. त्यामुळे ते कुचकामाचे आहेत अशी तृणमूलच्या (TMC) केंद्रीय नेत्यांची भावना झाली. राज्यात प्रचाराला वेळ मिळावा यासाठी निवडणूक लढवू शकत नाही असे म्हणत फातोर्ड्यातून माघार घेतली, मात्र, प्रत्यक्षात ते नावेली वगळता अन्य कुठेही प्रचारासाठी फिरकलेही नाहीत.

लुईझिन यांच्याकडून अपेक्षाभंग

राजकीय विश्‍लेषकांच्या मते, फालेरो हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत गोव्यात तृणमूल पक्षाला उभारी मिळणार अशी आय पॅकचे प्रशांत किशोर व ममता बॅनर्जी यांना अपेक्षा होती. पण ऐन निवडणुकीच्या काळात ते प्रभावहीन ठरत आहेत हे दिसून आल्यावर त्या दोघांचाही अपेक्षाभंग झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com