Bicholim Leapord Fear: डिचोलीत बिबट्याची दहशत! वनविभागाकडून अखेर पिंजरा तैनात

Bicholim Leapord Fear News: गेल्या काही दिवसांपासून डिचोली परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून डिचोली परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे. बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरु केल्याने ग्रामस्थांच्या झोपेचे खोबरे झाले असून, सायंकाळनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत वनविभागाने तातडीने पावले उचलली आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने परिसरातील संशयास्पद ठिकाणी लोखंडी पिंजरा लावला आहे. तसेच, त्याच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. वनविभागाने स्थानिकांना सतर्क राहण्याचे आणि रात्रीच्या वेळी लहान मुलांना घराबाहेर न सोडण्याचे आवाहन केले आहे. वन कर्मचाऱ्यांची गस्तही वाढवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com