Hazel Raikundalia swimming | Swim for Sea Hazel Raikundalia Dainik Gomantak
गोवा

'..किनारे वाचवा'! मुंबईच्या विद्यार्थिनीने पार केला गोव्याचा समुद्र; कुठ्ठाळी ते मिरामार पोहून राबवली Swim for Sea मोहीम

Swim for Sea Hazel Raikundalia: समुद्रातील वाढत्या प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने मुंबईतील २० वर्षीय हेजल रायकुंदालिया या ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थीनीने गोव्यात शनिवारी एक मोठे आव्हान पेलले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: समुद्रातील वाढत्या प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने मुंबईतील २० वर्षीय हेजल रायकुंदालिया या ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थीनीने गोव्यात शनिवारी एक मोठे आव्हान पेलले. तिने कुठ्ठाळी ते मिरामार असे २२ किमीचे खुल्या समुद्रातील अंतर पोहून पार केले. यासाठी तिला ४ तास २६ मिनिटांचा वेळ लागला.

हा मार्ग सलगपणे पोहणारी ती एकमेव जलतरणपटू आहे. तिच्या या कामगिरीचे गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे यांनी खास अभिनंदन केले आहे. मुंबईच्या हेजलने गोव्यात येउन पर्यावरणाबाबत दिलेला संदेश अमूल्य आहे. भारतीय समुद्रकिनारा स्वच्छ राहावा, यासठी ती ‘स्विम फॉर सी’ ही मोहीम राबवत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून तिने गोव्यात कुठ्ठाळी ते मिरामार असे २२ किमी अंतर पोहण्याचा मार्ग निवडला. अत्यंत खडतर असे आव्हान तिने सहज पार केले. वैद्यकिय क्षेत्राचे शिक्षण घेत असतानाही केवळ छंद आणि सामाजिक जबादारीची जाण असणाऱ्या हेजलने केलेली ही कामगिरी काैतुकास्पद आहे, असे गावडे यांनी म्हटले आहे.

त्यापूर्वी, पत्रकार परिषदेत राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेचे (एनआयडब्ल्यू) नोडल ऑफिसर डॉ. पवन गुप्ता यांनी हेजलच्या कामगिरीचे काैतुक केले. सध्या करिअरची चिंता लागलेल्या युवकांसाठी हा मोठा आदर्श आहे. हेजल वैद्यकिय शिक्षणाचे ओझे सांभाळत आपला पोहण्याचा छंदही जोपासत आहे. खुल्या समुद्रात पोहण्यासाठी प्रबळ मानसिकता गरजेची असते.

हेजलने ती दाखवून दिली आहे. गोवाचा समुद्रकिनारी हा खूप सुंदर आहे. हा किनारा स्वच्छ, सुंदर आणि प्रदुषणविरहीत राहावा, यासाठी १९ वर्षीय युवती राबवित असलेल्या मोहीमेची मी खास अभिनंदन करतो. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. दरम्यान, पत्रकार परिषदेत हेजलचे वडिल मिथेश रायकुंदालिया, प्रशिक्षक उमेश उत्तेकर, सुबोध सुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

समाधानकारक अनुभव

मी गोव्यात पहिल्यांदाच खुल्या समुद्रात पोहली आहे. येथील स्वच्छ पाण्याच्या मी प्रेमात पडली आहे. मी देशाबरोबरच विदेशातही पोहले आहे. मात्र गोव्यातील अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता. मी यापूर्वी बांद्रा-वर्ली सी लिंक ते गेटवे ऑफ इंडिया असा तब्बल ३६ किमीचा खुल्या समुद्रातील प्रवास यशस्वीपणे पार केलेला आहे. परंतु, गोव्यातील अनुभव माझ्यासाठी खास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Adult Content Ban: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' कडून भारतात अडल्ट कंटेंटवर बंदी; केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर इलॉन मस्क यांचे पाऊल

Tragic Death: चिंचणी हादरले! भीषण आगीत अंथरुणाला खिळलेल्या वृद्धेचा होरपळून मृत्यू; परिसरात हळहळ

Shani-Shukra Yuti 2026: 30 वर्षांनंतर मीन राशीत शुक्र-शनीची युती; 'या' 4 राशींना मिळणार अमाप पैसा आणि प्रगतीची संधी!

"इराणला गेले तर माझी हत्या होईल" 'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्रीनेचा थरारक खुलासा; जिवाच्या भीतीनं 10 वर्षांपासून मायभूमी पाहिली नाही

गौळादेवीच्‍या जत्रोत्‍सवामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी, 18 किलोमीटरच्‍या प्रवासाला तब्‍बल 6 तास; मंत्र्यांनाही आला विदारक अनुभव

SCROLL FOR NEXT