Positive Story: 'संकटांचा काळोख दाटला, मदतीचा दिवा उजळला'! आगीत घरदार, सोनंनाणं जळालं; 'त्या' कुटुंबाला मिळणार हक्काचे घर

Sattari Bhironda: दुर्घटनेवेळी माय-लेक दोघीही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याने आग काही मिनिटांतच पसरली आणि सर्व काही नष्ट झाले.
Sattari
SattariDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: पिळयेकरवाडा-भिरोंडा येथील गरीब महिला अंजनी तिवरेकर यांच्या घराला शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत घरासह कपडे, सोने, घरगुती साहित्य आणि सुमारे दीड लाखांची रोख रक्कम जळून खाक झाली. या दुर्घटनेत जवळपास १० लाखांचे नुकसान झाल्याने अंजनी आणि तिची मुलगी वनिता यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

याबाबतचे वृत्त दै. ‘गोमन्‍तक’मध्ये प्रकाशित होताच पर्येच्‍या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करताना स्वखर्चाने नवीन घर बांधून देण्‍याची घोषणा केली. एवढेच नव्‍हे तर रविवापासून घरबांधणीचे काम सुरू होणार आहे.

दुर्घटनेवेळी माय-लेक दोघीही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याने आग काही मिनिटांतच पसरली आणि सर्व काही नष्ट झाले. निवाऱ्याचा आणि अन्नाचा प्रश्‍‍न उभा राहिल्याने अंजनी हतबल झाल्या. त्‍यांनी मदतीसाठी याचना केली होती. अंजनी यांनी कृतज्ञता व्यक्त करताना आमदार दिव्‍या राणे यांचे आभार मानले.

Sattari
Vante Sattari Fire: ..अन डोळ्यासमोर स्वप्नांची राख झाली! वांते-सत्तरीत आगीचे तांडव; पैसे, कागदपत्रे, सोनेही खाक Watch Video

आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्‍त घरे दिली बांधून

आमदार डॉ. दिव्या राणे यांनी आत्तापर्यंत पर्ये मतदारसंघातील शंभरपेक्षा अधिक गरीब लोकांना स्वखर्चाने घरे बांधून दिली आहेत. हा भाग पूर्णपणे ग्रामीण असून तेथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे राहतात. अनेकांची घरे मातीची असल्याने पाऊस-वारा, वादळे तसेच नैसर्गिक संकटांमुळे ही घरे वारंवार कोसळतात. अशा प्रत्येक वेळी या कुटुंबांना एकच आधार असतो तो म्‍हणजे आमदार डॉ. दिव्या राणे. गेल्या एका महिन्यातच त्यांनी सालेली, पर्ये, मोर्ले व इतर भागांतील सहा कुटुंबांना नवीन घरे बांधून दिली आहेत.

Sattari
Sangli Fire News: लग्नघरात आगीचे तांडव! गोव्याच्या मायलेकीसह चौघांचा सांगलीत मृत्यू; मृतांत गरोदर महिलेचा समावेश

सत्तरीतील प्रत्येक गरीब कुटुंब हा माझा परिवार आहे. अंजनी यांना तातडीने निवाऱ्याची गरज होती. म्हणून स्वखर्चाने त्यांना नवे घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेची सेवा हीच आमची जबाबदारी आहे.

- डॉ. दिव्या राणे, आमदार (पर्ये)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com