court  Dainik Gomantak
गोवा

Swapnil Walke Murder Case: भरदिवसा गोळ्या झाडल्या, संपूर्ण गोवा हादरलं! स्वप्निल वाळके खून प्रकरणातील 'मास्टरमाईंड'ला कोर्टाचा दिलासा

Omkar Patil Bail: सराफ स्वप्निल वाळके खून प्रकरणातील संशयित ओंकार पाटील याला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने तीन महिन्याचा अतिरिक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मडगाव येथील सराफ स्वप्निल वाळके खून प्रकरणातील संशयित ओंकार पाटील याला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने तीन महिन्याचा अतिरिक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. वडिलाला प्रोटेस्ट कॅन्सर असल्याने व त्याची दृष्टीही अंधूक होत गेल्याने त्याच्या देखभालीसाठी गरज असल्याने जामिनात वाढ करावी, अशी मागणी संशयिताने न्यायालयात केली होती.

या जामीन अर्जावर न्यायालयात (Court) युक्तिवाद झाला. सरकारी वकील एस. सामंत यांनी जोरदार विरोध केला. संशयितावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. वाळके खून प्रकरणातील तो मास्टरमाईंड आहे. त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यास, मृत्युदंड वा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, अशाला जामीन मंजूर करू नये असा युक्तिवाद सरकारी वकिलाने केला.

तर संशयिताच्या वकिलाने आपल्या अशिलाने जामिनावर असताना कुठलाही गुन्हा केला नाही, तसेच वाळके खून प्रकरणाच्या सुनावणीस तो नियमित हजर राहिला आहे. त्याची आई वृद्ध आहे. वडिलाची देखभालीसाठी त्याला ज्यादा जामीन द्यावा, अशी मागणी केली. न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेऊन मानवतावादी दृष्टीने त्याला तीन महिन्याचा अंतरिम जामीन देण्यात येत असल्याचा निवाडा दिला.

सप्टेंबर २०२० साली मडगावात (Margao) कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील यांचा भरदिवसा गोळ्या झाडून खून झाला होता. या प्रकरणात मागाहून क्राइम ब्रँचने ओंकार पाटील, मुस्तफा शेख व इव्हेंडर रॉड्रिग्ज यांना अटक केली होती. संशयितांना पिस्तूल विकल्यासंबंधी नंतर बिहार राज्यातून शनी कुमार, राहुल कुमार व कुंदन कुमार यांना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT