Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa: स्‍वदेशी वस्‍तूंना प्राधान्‍य द्या, देश बळकटीत सहभागी व्‍हा! पर्यटनमंत्री खंवटेंचे आवाहन

Rohan Khaunte: लोकांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देऊन देशाला बळकटी हातभार लावावा, असे आवाहन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले. राष्ट्र उभारणीस फायदेशीर ठरतात, असे खंवटे म्‍हणाले.

Sameer Panditrao

म्हापसा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत’च्या दृष्टिकोनातून आपला देश प्रगती करत आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपले राज्य देखील युवक, महिला, शेतकरी व गरीबांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. लोकांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देऊन देशाला बळकटी हातभार लावावा, असे आवाहन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.

म्हापसा येथील प्रशासकीय संकुलात देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर खंवटे हे उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, उपजिल्हाधिकारी वर्षा परब, पांडुरंग गाड, मामलेदार अनंत मलिक, माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर, वरिष्ठ अधिकारी दशरथ रेडकर व अन्‍य मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण लाल बहादूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस व इतर स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करतो. लोकमान्य टिळक आणि त्यांचे स्वराज्याचे स्वप्न व सुभाषचंद्र बोस यांचा क्रांतिकारी उत्साह आपल्याला प्रेरणा देतो. या नेत्‍यांचे विचार आपणला राष्ट्र उभारणीस फायदेशीर ठरतात, असे खंवटे म्‍हणाले.

धारबांदोडा, वाळपई, पणजी व पर्वरी या चार ठिकाणी नवीन कॉमन सर्व्हिस सेंटर स्थापन केले जाणार आहे. ज्यामुळे डिजिटल सेवांपर्यंत लोक सहज पोहोचू शकतील. शिवाय ‘हर घर फायबर’ प्रकल्प पर्वरी, साखळी व डिचोली येथे प्रायोगिक तत्वावर राबविला जाईल.

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

Crime News: भरदिवसा सुरीने हल्ला; सूरज कसबेचा जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

SCROLL FOR NEXT