Suvendu Adhikari  Dainik Gomantak
गोवा

West Bengal Victory: सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू सरकार; तामिळनाडूत विजय सत्तेच्या जवळ

Suvendu Adhikari West Bengal CM: प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावणारे भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी हेच राज्याचे कारभारी होणार असल्याचे आज स्पष्ट झाले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

कोलकता/चेन्नई: प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावणारे भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी हेच राज्याचे कारभारी होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. भाजप विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली. उद्या (ता. ९) सकाळी ११ वा. त्यांचा मुख्यमंत्रिपदी शपथविधी होईल. तमिळनाडूमध्येही ‘टीव्हीके’चे प्रमुख जोसेफ विजय यांच्या सत्तेच्या जवळ पोहोचले आहेत. भाकप आणि माकप या डाव्या पक्षांनी त्यांना पाठिंबा जाहीर केले आहे.

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री आणि प. बंगालमधील पक्षाचे निरीक्षक अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर सुवेंदू यांनी लोकभवन गाठत राज्यपाल एन. रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. कोलकत्यातील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा शपथविधी पार पडेल. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) बडे नेते उपस्थित राहतील.

इंडिया आघाडीची एकजूट संकटात? :

तमिळनाडूत काँग्रेसने द्रमुकची साथ सोडून अभिनेते विजय यांच्या ‘टीव्हीके’ला पाठिंबा दिल्‍यामुळे लोकसभेमध्ये विरोधी बाकांवर काँग्रेससोबत बसण्याची व्यवस्था नको, असे म्हणत द्रमुकने लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र आसन व्यवस्थेची मागणी केली आहे. तर, ‘अडचणीच्या काळात आम्ही मित्रांना सोडून देणारे नाही,’ असा अप्रत्यक्ष टोला समाजवादी पक्षाने लगावला आहे.

पाठिंब्याच्या पत्रासाठी धावपळ

डाव्यांनी पाठिंबा देऊनही ‘टीव्हीके’चे नेते विजय सत्तेपासून अद्याप दूरच आहेत. काँग्रेसबरोबरच भाकप आणि माकपने त्यांना पाठिंबा दिल्याचे पत्र दिले आहे. व्हीसीके पक्षाने उपमुख्यमंत्रिपद देण्याची अट ठेवल्याचे समजते. तसेच, ‘आययूएमएल’ या पक्षानेही तोंडी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे, विजय यांच्याकडे सध्या ११६ इतके संख्याबळ झाले आहे. बहुमत नसल्याने राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिलेले नाही. व्हीसीके आणि आययूएमएल यांच्या पाठिंब्याचे पत्र मिळविण्यासाठी ‘टीव्हीके’चे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांनी एकत्रित सत्ता स्थापन केल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा टीव्हीकेच्या विजयी उमेदवारांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT