POCSO Case Dainik Gomantak
गोवा

POCSO Case: पोलिस निरीक्षकासह महिला संशयिताची जामिनासाठी धाव! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पॉक्सो न्यायालयात अर्ज

Vikas Deikar Bail Application in POCSO Case: प्रकरणातील दोन्ही संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेले गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक विकास देईकर (४०) आणि सहसंशयित रजनी पालेकर (३७) यांनी पॉक्सो न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत.

या प्रकरणातील दोन्ही संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता त्यांच्यावतीने जामिनासाठी कायदेशीर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. जुने गोवे पोलीस ठाण्यात पॉक्सो कायदा, २०१२ आणि भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हा संतापजनक प्रकार गुन्हे शाखेच्या कार्यालयातच घडल्याचा आरोप असल्याने संपूर्ण पोलिस दल आणि गृह खात्याच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका महिलेसह पोलिस निरीक्षकाचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस प्रशासनाकडून कमालीची गुप्तता

न्यायालयातील सुनावणीनंतर आणि जामीन अर्ज दाखल झाल्यानंतर या अतिसंवेदनशील प्रकरणाची कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी जुने गोवे पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रसारमाध्यमांसमोर काहीही न बोलण्याचा अलिखित दबाव असल्याचे सूत्रांकडून समजते. खात्यातीलच अधिकारी या गंभीर गुन्ह्यात अडकल्यामुळे पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usman Khawaja Sandpaper Scandal: सँडपेपर प्रकरणावर उस्मान ख्वाजाचा खळबळजनक खुलासा! म्हणाला, ' संपूर्ण संघाचा सहभाग होता'; स्मिथ-वॉर्नरबाबतही मोठा दावा

La Mirage: 'ला मिराज'ची कोकणी नाट्यस्पर्धेत बाजी! 'फेरल' द्वितीय, तर 'अर्दकुटें कवन' तृतीय

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालची दिवाळी तुरुंगातच! सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या वेबसाइटवर नवीन अपडेट! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीशी संबंध की फक्त 'मन की बात'चा संदेश?

Election Commission of India: 6 महिन्यांत 39 लाख मतदार वाढले कसे? यशोमती ठाकूर यांचा सवाल; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

SCROLL FOR NEXT