Calvin Bus Accident  Dainik Gomantak
गोवा

Panaji: कालवी स्कूलबस अपघात प्रकरण! 10 वर्षानंतर बस चालकाची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका

पणजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायानयाने हा निर्णय दिला आहे.

Pramod Yadav

Calvin Bus Accident: शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या स्कूलबसचा 18 फेब्रुवारी 2012 मध्ये कालवी नदीत अपघात झाला होता. या अपघात प्रकरणातील बस चालकाची तब्बल दहा वर्षानंतर पुरेशा पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पणजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायानयाने हा निर्णय दिला आहे. राजेश नाईक असे या बस चालकाचे नाव आहे. दहा वर्षापूर्वी झालेल्या या अपघातात शालेय मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला होता.

नेमकं प्रकरण काय?

सेंट थॉमस गर्ल्स शाळेची बस 8-11 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. हळदोणा ते कालवी दरम्यान कालवी नदीच्या पुलावरून ही बस नदीत कोसळली. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह महिला केअर टेकर देखील होत्या. अपघातात विद्यार्थ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी बसचा चालक राजेश नाईक याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपखाली अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT