Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: स्वतःच्या मुलीसोबत भांडण केल्‍याच्‍या रागातून पालकांची शाळकरी मुलीला मारहाण

Man Arrested for Assaulting 11 Year Old Girl: शाळकरी मुलींमध्ये झालेल्या भांडणावरून अकरा वर्षीय मुलीला धमकी देण्यासह तिला मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा, ता. २३ (प्रतिनिधी): शाळकरी मुलींमध्ये झालेल्या भांडणावरून अकरा वर्षीय मुलीला धमकी देण्यासह तिला मारहाण केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी संशयित आरोपी गौतम संजय वर्मा (३६, रा. कळंगुट व मूळ उत्तर प्रदेश) यास अटक केली; तर त्याच्या संशयित पत्नीच्या नावे नोटीस बजावली आहे.

ही घटना बुधवारी (दि. २३ ऑक्टोबर) रोजी सकाळी ७:३०च्या सुमारास आगरवाडा-कळंगुट जंक्शनवर घडली. याप्रकरणी हडफडे येथील पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली.

पीडित मुलगी व संशयिताची मुलगी या दोघीही म्हापशातील एकाच शाळेत सहावीच्या वर्गात शिकतात. त्या एकाच टेम्पो ट्रॅव्हल्‍समधून शाळेत ये-जा करतात. या दोघींमध्ये शाळेत भांडण झाले होते.

संशयितांच्या मुलीने पालकांना ही घटना सांगितली आणि त्यांनतर सकाळी आगरवाडा-जंक्शनवर मुलीला शाळेत सोडण्यासाठी आलेले संशयित पालक गाडीत चढले व त्यांनी पीडित मुलीला शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच संशयित शिखा वर्मा हिने पीडितेच्या कानशिलात मारली असता, ती किरकोळ जखमी झाली.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम ३५२, ११५(२), ३(५) व गोवा बाल कायदा कलम ८(२) अन्वये गुन्हा दाखल केलाय. संशयित आरोपी गौतम वर्मा यास अटक करण्यात आली असून संशयित महिलेविरुद्ध नोटीस जारी केली गेली आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्नेहल मळीक करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT