Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई

Illegal Constructions Demolished: अनधिकृत ५० बांधकामे पाडण्याचा आदेश जारी केला होता, त्यापैकी १४ जणांनी कोर्टात धाव घेतली.
Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई
Illegal Constructions along NH66 Demolished Dainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Constructions Demolished In Mapusa

म्हापसा: येथील करासवाडा जंक्शनवरील तब्बल ३५ अनधिकृत बांधकामे आज म्हापसा नगरपालिकेने पोलिस संरक्षणात जेसीबीच्या साहाय्याने जमिनदोस्त केली.

जंक्शनवरील होणारी रोजची वाहतूक कोंडी तसेच रस्ता रुंदीकरणात अडथळा निर्माण करणारी ही बेकायदा गाळेवजा दुकाने अखेर पाडण्यात आली. यामध्ये एका स्थानिक पालिका लोकप्रतिनिधीचे देखील बेकायदा बांधकाम हटविण्यात आले.

म्हापसा पालिका मुख्याधिकारी या बांधकामामागे राजकीय हस्तक्षेप नाही, असा दावा करीत असले तरी इतकी वर्षे या जंक्शनवर बिनदिक्कतपणे अनधिकृत व्यवसाय चालू होता आणि नगरपालिका किंवा इतर अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे याकडे कानाडोळा केला होता.

Demolished Illegal Construction
Demolished Illegal ConstructionDainik Gomantak

आता जंक्शनवर होणारी सततची वाहतूक कोंडी लक्षात घेता, तसेच रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळेच पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारल्याचा आव आणत आहे. मग इतके दिवस पालिकेने या बेकायदेशीरपणाकडे का दुर्लक्ष केले ? असा सवाल स्थानिकांतून विचारला जात आहे.

Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई
Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

14 जणांची कोर्टात धाव

अनधिकृत ५० बांधकामे पाडण्याचा आदेश जारी केला होता, त्यापैकी १४ जणांनी कोर्टात धाव घेतली. यातील काही बांधकामांना स्थगिती मिळाली, तर एकाने स्वतःहून आपले बांधकाम हटविले. उर्वरित ३५ बांधकामे आम्ही हटविली, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

Demolished Illegal Construction
Demolished Illegal ConstructionDainik Gomantak

मध्यंतरी पालिकेने येथील काही बांधकामे हटविली होती. मात्र, महामार्गावरील सर्व्हिस रस्ता आल्यानंतर ही बांधकामे पुन्हा अवतरली, असा दावा त्यांनी यावेळी केला.

ज्यांनी कोर्टातून कारवाईवर स्थगिती आणली, त्यांचे बांधकाम आम्ही पाडणार नाही, परंतु सुनावणी पूर्ण होईपर्यंत संबंधितांना कुठलाही व्यवसाय करता येऊ नये म्हणून पालिका दुकानांना सील ठोकणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com