Xelvona Curchorem Goa Suryakant Desai 2015 murder case | Margao Court Dainik Gomantak
गोवा

Suryakant Desai: सूर्यकांत देसाई हत्‍या प्रकरणात माय-लेकाला दहा वर्षांची सक्तमजुरी

दैनिक गोमन्तक

Suryakant Desai Murder Case: मालमत्तेच्या वादातून शेळवण - कुडचडे येथील सूर्यकांत देसाई यांचा खून केल्याचा आरोप असलेली त्याची काकी शेवंती देसाई व तिचा मुलगा हेमंत देसाई या दोघा माय-लेकाला दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश पूजा कवळेकर यांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवून प्रत्‍येकी दहा वर्षांच्‍या सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावली.

तसेच दोन्‍ही संशयितांना प्रत्‍येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्‍यात आला आहे. ही शिक्षा सुनावल्‍यानंतर संशयितांच्‍या वकिलांनी या शिक्षेच्‍या कार्यवाहीला उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान देण्‍यासाठी तीन दिवसांची स्‍थगिती मागितली होती.

मात्र न्‍या. कवळेकर यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्‍यानंतर दोन्‍ही संशयितांना पोलिसांनी रीतसर अटक केली.

या प्रकरणात कुडचडेचे तत्‍कालीन पोलिस निरीक्षक रवी देसाई यांनी तपास केला होता. सरकारी वकील देवानंद कोरगावकर यांनी न्‍यायालयासमोर सबळ पुरावे सादर करून आरोपीवरील गुन्‍हा सिद्ध केला.

सुरवातीला या प्रकरणी खुनाच्‍या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले होते. मात्र, न्‍यायालयाने त्‍यांना सदोष मनुष्‍यवधाच्‍या गुन्‍ह्याखाली दोषी ठरविले होते.

जमिनीवरून वाद : मारहाणीत मृत्यू

ही खुनाची घटना शेळवण, कुडचडे येथे २३ फेब्रुवारी २०१५ रोजी घडली होती. २०१८ मध्ये शेवंती आणि तिचा मुलगा हेमंत ऊर्फ सर्वेश देसाई यांच्यावर खुनाचे आरोप निश्चित करण्यात आले होते.

संशयित शेवंती देसाई, हेमंत देसाई व सूर्यकांत देसाई यांच्यात जमिनीचा वाद सुरू होता. सूर्यकांत हा शेवंतीच्या दिराचा मुलगा होता. या जमिनीत संरक्षण भिंत बांधण्यावरून सूर्यकांत यांच्या राहत्या घराबाहेर २३ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांच्यात भांडण सुरू झाले.

सुरवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर प्रकरण हाताघाईवर आले. शेवंतीने सूर्यकांतला पकडून जमिनीवर ढकलले. तो जमिनीवर पडल्यानंतर मुलगा हेमंतने कुदळीने त्याच्यावर वार केले. यात सूर्यकांत याचा मृत्यू झाला असा पोलिसांनी त्‍यांच्‍यावर आरोप ठेवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT