Goa CM On LPG Price
Goa CM On LPG PriceDainik Gomantak

Goa CM On LPG Price: आधीचे आणि आत्ताचे 200 तसेच रिफीलसाठी 275 रुपये, CM सावंतांनी हिशोब सांगत मानले PM मोदींचे आभार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील मोदींचे आभार मानत सबसिडी आणि रिफिलसाठी दिली जाणारी मदत याचा हिशोब सांगितला आहे.

Goa CM On LPG Price: महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सरकारने गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी मंजूर केली आहे. या निर्णयाबाबत भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील मोदींचे आभार मानत सबसिडी आणि रिफिलसाठी दिली जाणारी मदत याचा हिशोब सांगितला आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी मंजूरीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक ट्विट केले आहे.

'एलपीजी गॅसच्या किंमतीत दोनशे रूपये कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. आधीच्या पंतप्रधान उज्वला योजनेच्या 200 रूपये सबसिडीमध्ये ही अधिकची सवलत असेल.'

'गोवा सरकार एलपीजी सिलिंडर रिफिलिंगसाठी मुख्यमंत्री आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजना कुटुंब लाभार्थ्यांना दरवर्षी 3 एलपीजी सिलिंडरसाठी 275 रुपये देते. या निर्णयामुळे गोव्यातील आणि संपूर्ण भारतातील ग्राहकांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे.'

दरम्यान, उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलिंडर ₹ 200 अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारवर सुमारे 7,500 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com