Surangi flowers in Goa
डिचोली: दुर्मीळ अशा ‘सुरंगी’च्या फुलांचे अखेर डिचोलीच्या बाजारात दर्शन झाले असले, तरी यंदा या फुलांच्या बहरावर विपरीत परिणाम झाल्याचे आढळून येत आहे. हवामान संतुलित राहिले, तर ठीक. अन्यथा यंदा ‘सुरंगी’ फुलांचा मोसम अल्पावधी ठरण्याची शक्यता आहे.
‘सुरंगी’ची फुले तशी दुर्मिळ. मात्र पिवळीगुंज आणि मनमोहक सुगंधामुळे ‘सुरंगी’ची फूले प्रत्येकाला आकर्षित करतात. विशेष करुन महिलावर्गाला तर ही फूले वेड लावतात. या सुवासिक फुलांचे दर्शन सध्या डिचोलीत होत असून, सुरंगीच्या वळेसरांना बाजारात मागणी आहे.
सुरगीच्या गजऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने ती महाग झाली आहेत. सध्या प्रति वळेसर १०० रुपये दराने विकण्यात येत आहेत. सध्या डिचोलीतील कुडचिरे आणि महाराष्ट्रातील सीमेवरील ‘आयी’ गावातून सुरंगीची फूले बाजारात येत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याचे प्रमाण एकदमच कमी आहे.
डिचोलीतील सर्वणसह म्हावळींगे, कुडचिरे, मये, कारापूर आदी काही ठरावीक गावात सुरंगीची झाडे आहेत. डिचोली शहरापासून जवळच असलेला ''सर्वण'' गाव तर सुरंगीच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. एक काळ असा होता, की या गावात ५० हून अधिक सुरंगीची झाडे होती. सध्याच्या घडीस सर्वण गावात २० ते २५ च्या आसपास झाडे आहेत.
यंदाच्या बदलत्या हवामानामुळे सुरंगीच्या बहरावर परिणाम झाला असून मोसमही लांबणीवर पडला आहे. दरवर्षी साधारण जानेवारी महिन्याच्या सरतेशेवटी ''सुरंगी''ना बहर येत असे. मात्र यंदा हा बहर साधारण महिनाभर लांबणीवर पडला आहे. अवकाळी पाऊस त्यातच धुक्याचा प्रादुर्भाव यामुळे ''सुरंगी'' फुलांवर परिणाम झाला आहे, असा जाणकारांचा दावा आहे. कळे धरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हवामान अनुकूल आणि पोषक राहिल्यास आठ दिवसांनी या फुलांचा ''भार'' होण्याची शक्यता आहे, असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.