Marigold Flowers: गोव्‍यात झेंडू बहरला! उत्पादनात लक्षणीय वाढ, 30 हेक्‍टर जमीन लागवडीखाली

Marigold Production: गोव्‍यातील झेंडू फुलांच्‍या उत्‍पादनात यंदा विक्रमी वाढ झाली असून यंदा १८० टन फुलांचे उत्‍पादन झाल्‍याची माहिती गोव्‍याचे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली. मागच्‍या वर्षीच्‍या तुलनेत हे पीक ३० टनांनी वाढले आहे, असे त्‍यांनी सांगितले.
Goa Marigold Market
Goa Marigold MarketCanva
Published on
Updated on

Marigold Flower Production In Goa

मडगाव: गोव्‍यातील झेंडू फुलांच्‍या उत्‍पादनात यंदा विक्रमी वाढ झाली असून यंदा १८० टन फुलांचे उत्‍पादन झाल्‍याची माहिती गोव्‍याचे कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली. मागच्‍या वर्षीच्‍या तुलनेत हे पीक ३० टनांनी वाढले आहे, असे त्‍यांनी सांगितले. गोव्‍यातील स्‍थानिक शेतकरी झेंडू फुलांच्‍या उत्‍पादनात आता रस दाखवित आहेत हे त्‍यातून सिद्ध झाले आहे.

यावेळी अतिरिक्‍त जमीन लागवडीखाली आणल्‍यामुळेच फुलांचे उत्‍पादन वाढले अशी माहिती फळदेसाई यांनी दिली. गोव्‍यात यापूर्वी सुमारे २५ हेक्‍टर जमिनीत हे उत्‍पादन घेतले जायचे आणि सरासरी त्‍यात १५० टन उत्‍पादन व्‍हायचे. यंदा झेंडूच्‍या शेतीसाठी ३० हेक्टर जमीन लागवडीखाली आणली गेली. त्‍यामुळे हे उत्‍पादन १५० टनांवरून १८० टनांवर पोचले आहे, असे त्‍यांनी सांगितले.

Goa Marigold Market
Corruption Cases In Goa: पाच वर्षांत भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षाच नाही! निलंबित अधिकारी पुन्हा सेवेत रुजू, वाचा धक्कादायक रिपोर्ट

गोव्‍यात झेंडूंच्‍या फुलांना गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी या तीन सणात मोठी मागणी असते, याशिवाय लग्‍न समारंभ आणि इतर देवकृत्‍यांसाठी झेंडू फुलांचा वापर केला जातो. झेंडूंचे गजरे आणि हार केले जातात. त्‍याशिवाय मंदिराच्‍या शोभेसाठी झेंडू फुलांचा वापर केला जातो.

Goa Marigold Market
Tiger Attack: ..अचानक समोर आला वाघ! हल्ला करणार इतक्यात; चोर्ला घाटातील थरारक प्रसंग वाचा

३० हेक्‍टर जमीन लागवडीखाली

२०२३ पासून गोव्‍यात झेंडू फुलांच्‍या उत्‍पादनात वाढ होऊ लागली आहे. सुरुवातीला १७ हेक्‍टर जमीन फुलशेतीसाठी लागवडीखाली आणली जायची. २०२३ साली एकूण २५ हेक्‍टर जमीन या उत्‍पादनासाठी वापरली गेली. यंदा ही जागा ३० हेक्टरवर पोचली आहे. झेंडूंचे उत्‍पादन घेण्‍यासाठी कृषी खात्‍याकडून आर्थिक मदत दिली जात असून दर हेक्‍टरमागे झेंडू उत्‍पादकांना कृषी खात्‍याकडून ७५ हजार रुपयांची मदत मिळते, असे फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com