वास्को : राज्याचे पोलिस महासंचालक डॉ. इद्रदेव शुक्ला जनतेचे सेवक आहेत की भारतीय जनता पक्षाचे? हे त्यांनी सर्वप्रथम जनते पुढे मांडावे. मुरगाव बोगदा येथे रंगपंचमीदिनी (दि.१८मार्च) झालेल्या भांडणात माझ्या बरोबर इतरांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असून या विरोधात न्यायासाठी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुरज चोडणकर यांनी दिली आहे. त्यांनी ही माहिती वास्को येथे आयोजीत पत्रकार परिषदेतून सुरज उर्फ बालन चोडणकर यांनी दिली आहे.
तसेच भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भांडणात आपला अजिबात संबध नसून आपल्यावर येथील माजी मंत्री व पोलिस महासंचालकांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. तर पोलिस महासंचालक डॉ. शुक्ला यांनी राज्यातील मटका, जुगार अड्डये बंद करावेत असे चोडणकर यांनी खुले आवाहन यांना दिले आहे. यावेळी त्याच्या समवेत समाजकार्यकर्ता शंकर पोळजी,अॅड. अविनाश नाईक, सौ विनी सचिन भगत व भांडणात अटक केलेल्या संशयीता बरोबर त्याचे पालक उपस्थित होते. (Suraj Chodankar has alleged that the Director General of Police has filed false charges against him)
18 मार्च रंगपंचमी दिनी मुरगावातील बोगदा, सडा परिसरात भाजप (BJP) व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भांडणात बोगदा येथील रहीवासी प्रदीप मयेकर यांच्यावर काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी हमला केला व मयेकर यांच्या घरावर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी अल्पवयीन मुलांबरोबर अनेकांवर गुन्हे दाखल केले. सदर प्रकरणात अकरा जणांना अटक करून नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तर इतरांनी अटकपुर्व जामिन मिळविला आहे.
पुढे माहिती देताना चोडणकर म्हणाले की, माझ्यावर छोटे -मोठे असे पुर्वीचे २० पेक्षा जास्त गुन्हे असतील, पण यातील एकाही प्रकरणात चोविस तास पोलिस कोठडी झालेली नाही. तर या भांडणात पोलिसांनी आपल्यावर सुडबुध्दीने गुन्हे नोंदवून मला कुविख्यात गुन्हेगार केल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
तसेच पोलिस जनतेचे सेवक असतात तेच जर लोकशाहीत हुकूमशाही प्रमाणे वागत असतील तर सामान्य जनतेने न्यायासाठी कुठे जायचे? असा प्रश्न चोडकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. मुरगाव पोलिस स्थानकांत पोलिस (Police) निरीक्षक असताना बदली झालेल्या निरीक्षकांकडून गुन्हे नोंद करणे हे चुकीचे आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलावर गुन्हे नोंदवून कायदा सुवेवस्थेची थट्टा पोलिसांनी उडवलेली आहे, असेही चोडणकर म्हणाले.
तसेच सामाजिककार्यकर्ते शंकर पोळजी यांनी, पोलिसांनी सुडबुध्दीने हे गुन्हे दाखल केले आहेत. मुख्यमंत्र्यानी (CM) या प्रकरणी लक्ष घालून सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा. तर भगत यांनी सांगितले की, या प्रकरणात पूर्णपणे राजकारण (Politics) करून माझ्या कुंटूबाला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.