Goa Latest News
Goa Latest NewsDainik Gomantak

काणकोण महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करा: जनार्दन भंडारी

व्यावसायिक गाड्यांपासून होणाऱ्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी मुख्य सचिवांना निवेदन सादर केले आहे.
Published on

मडगाव : काणकोण महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त प्रामाणात मालवाहतूक करणाऱ्या व अतिवेगाने जाणाऱ्या ट्रक आणि इतर व्यावसायिक गाड्यांपासून होणाऱ्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी मुख्य सचिवांना निवेदन सादर केले आहे.

Goa Latest News
IPL 2022: विकेट पडल्यावर हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने दिली अशी प्रतिक्रिया

भंडारी यांच्या म्हणण्यानुसार वाहतूकीच्या या समस्येमुळे अपघात होऊ शकतो. यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अपघात झाल्यास लोकांना आणि जनावरांना नुकसान होऊ शकते. "याच्या व्यतिरिक्त या महामार्गावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी (Traffic) होत आहे. या समस्येचे निवारण करणे आवश्यक आहे. तसेच जिथे जिथे अरुंद रस्ते आहेत, तिथे काळजी घेणे व रस्त्तांची डागडूजी करणे आवश्यक आहे." असे भंडारी म्हणाले.

मडगाव-काणकोण मार्गावर विविध ठिकाणी दिवसेंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. अशा वाहतूक कोंडीमुळे कामावर जाणारे लोक, विद्यार्थी आदींना त्रास सहन करावा लागत आहे, असे ते म्हणाले.

क्षमतेपेक्षा जास्त प्रामाणात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई झाल्यास त्याचा फायदा राज्याच्या तिजोरीला होऊ शकतो, अशी सुचना त्यांनी केली आहे. या मुद्द्याकडे त्यांनी मुख्य सचिवांचे लक्ष वेधले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात, मालवाहतूकीची क्षमता तपासण्यासाठी राज्याच्या सर्व सीमेवरील नाक्यांवर वेइंग मशिन बसवण्याची मागणी केली आहे. या माध्यमातून राज्याला अधिक कर मिळू शकतो. कायदा भंग करणाऱ्यांवऱ कारवाई करणे गरजेचे असून वाहतूक संचालनालयाने या मार्गावर लक्ष ठेवले पाहिजे. वेगाचे किंवा क्षमतेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोरपणे दंड व कलमे लावली जावीत. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व्यस्त ठिकाणी कर्मचारी तैनात केले पाहिजे. तसेच कुंकळ्ळी ते काणकोण येथील अरुंद रस्त्याच्या समस्येचे निवारण करणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी खनिज वाहतूक बंद करणे अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com