Nitin Gadkari in Goa Dainik Gomantak
गोवा

स्थैर्य आणि विकासासाठी भाजपाला साथ द्या: नितीन गडकरी

दैनिक गोमन्तक

Nitin Gadkari: माझ्या खात्याने गोवा राज्याला आजवर 40 हजार कोटींचा निधी देऊन पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. मुंबई ते गोवा महामार्गासाठी मोठा निधी दिला. स्व. मनोहर पर्रीकर आणि खासदार श्रीपाद नाईक यांच्या आग्रहामुळे मोपा विमानतळ साकारत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आज सायंकाळी पेडणे, थीवी आणि शिवोली मतदारसंघात कोपरा सभा घेतल्या. या तिन्ही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. (Support BJP for stability and development Nitin Gadkari said)

पेडणे येथील सभेत बोलताना ते म्हणाले, भाजपा सरकारच्या काळात पेडणेचा विकास होणे सुरू झाले. स्व. पर्रीकर यांच्या स्वप्नातील गोवा घडवण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) प्रयत्नशील आहेत. मुंबई - गोवा महामार्ग पूर्णत्वास येत आहे. यापुढे गोवा - कर्नाटक महामार्ग होणार आहे. यासाठी मी 15 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गोव्यातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिला असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले.

पेडणेतील नियोजित आयुष हॉस्पिटल, स्पोर्ट सिटी, मोपा विमानतळ हे प्रकल्प भाजपाच्या काळात उभे राहत आहेत. या सर्व ठिकाणी स्थानिक युवकांना रोजगार मिळेल. तर हजारो युवकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी मिळेल.

पेडणेतील सभेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे (Sadanand Shet Tanavade), केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उमेदवार प्रवीण आर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इतर मान्यवरांची भाषणे झाली.

थीवी येथील सभेत बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, गेल्या दहा वर्षांत भाजपाने देशात आणि गोव्यात मोठा विकास केला आहे. कधीकाळी राजकीयदृष्ट्या अस्थिर गोवा म्हणून प्रसिद्ध होता. पण भाजपाने सलग दहा वर्षे स्थिर आणि पारदर्शी सरकार दिले. यामुळे लोकांचा भाजपवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे.

थीवी येथील सभेला प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उमेदवार निळकंठ हळर्णकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

शिवोली येथील सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, सध्या खाणी बंद असल्याने राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. या गोष्टीचा विचार करून भाजपाने राज्यातील पर्यटन दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. पुढील काळात राज्यातील खाणीही (Goa Mining) सुरू केल्या जातील. पर्यटनपूरक उद्योग निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. आपल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल. श्री. गडकरी यांनी या तिन्ही ठिकाणी विकास आणि पारदर्शक कारभारासाठी भाजपाला प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन केले.

शिवोलीतील सभेस मंत्री श्रीपाद नाईक, उमेदवार दयानंद मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. गडकरी यांच्या दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या सभांवेळी स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT