मडगाव : मडगाव बस स्थानक (Margao Bus Stand) प्रकल्प विजय सरदेसाई यांच्यामुळे अडला असा आरोप मुख्यमंत्री करतात तो बरोबर नसून हा प्रकल्प केवळ जी सुडा या प्राधिकरणाने घेतलेल्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे अडला असे मत जी सुडाचे माजी सदस्य व फोंड्याचे माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक (Venkatesh Naik) यांनी मांडले. (The Madgaon Bus Stand Project Could Not Be Completed Due To Suda Authority)
दरम्यान, आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाईक म्हणाले, आज जिथे बसस्थानक आहे तिथे अत्याधुनिक सुविधा असलेला बस टर्मिनस आणण्याचा प्रकल्प विजय सरदेसाई यांनी पुढे आणला होता. मात्र त्यासाठी जमीन मोठी हवी होती. या बसस्थानकाच्या बाजूला जी जमीन जी सुडाच्या मालकीची आहे ती वाहतूक खात्याला हस्तांतरित करावी अशी मागणी करण्यात आली होती. पण जी सुडाने आपली जमीन देण्यास नकार दिल्याने हा प्रकल्प रखडला. नंतर गोवा फॉरवर्ड आमदारांना सरकारातून काढून टाकण्यात आले आणि नंतर हा प्रकल्प रखडला असे ते म्हणाले.
तसेच, भंडारी समाजाचे प्रश्नही विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी विधानसभेत हिरीरीने मांडले. भंडारी समाजाला राखीवता वाढवून देण्याचा मुद्दा विधानसभेत आला त्यावेळी विजय सरदेसाई यांनीच त्याला पाठिंबा दिला होता. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या सरकारला पाठिंबा दिल्यावर गोवा फॉरवर्डला (Goa Forward) सुरवातीला दोनच मंत्रीपदे देऊ केली होती. त्यावेळी सरदेसाई यांनी आपल्याला मंत्रिपद नको पण आपल्या दोन भंडारी सहकाऱ्यांना मंत्री करावे अशी सूचना केली होती याकडे नाईक यांनी लक्ष वेधले. व्यंकटेश नाईक यांच्यासह माजी नगराध्यक्ष पूजा नाईक, नगरसेवक रवींद्र नाईक, माजी नगरसेवक राजू शिरोडकर व भंडारी युवा समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद मांद्रेकर या पाच भंडारी नेत्यांनी या पत्रकार परिषदेत भाग घेतला होता.
शिवाय, आता दामू नाईक यांनी आपल्या स्वार्थासाठी भंडारी कार्ड वापरू नये त्यांनी भंडारी समाजासाठी काय ते आधी स्पष्ट करावे अशी मागणी रवींद्र नाईक यांनी केली तर सोनसोडो समस्या सोडवण्यासाठी विजय सरदेसाई यांनी काय प्रयत्न केले ते माजी कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जी यंत्रणा सरकारी खात्याने सुचविली होती. ती आणण्याची तयारी मडगाव पालिकेने ठेवली होती. मात्र सरकारनेच मुद्दामहुन वेळकाढूपणा करून हे काम अडवून ठेवले असा आरोप त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.