Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: स्थिर सरकारसाठी भाजपला पाठिंबा द्या: जी. किशन रेड्डी

राज्यात स्थिर, विकासाभिमुख, धार्मिक सलोखा राखणारे आणि पर्यटन फ्रेंडली सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा द्या, असे मत केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

Goa BJP: राज्यात स्थिर, विकासाभिमुख, धार्मिक सलोखा राखणारे आणि पर्यटन फ्रेंडली सरकार स्थापन करण्यासाठी लोकांनी परत एकदा भाजप (BJP) उमेदवारांना पाठिंबा देऊन निवडून आणावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी केले.

सांगे येथे सुभाष फळदेसाई (Subhash Faldesai) यांच्या कार्यालयाचे उद्‍घाटन श्री. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे उमेदवार सुभाष फळदेसाई, माजी आमदार वासुदेव गावकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, माजी सरपंच शशिकांत गावकर मंडळ अध्यक्ष बायो भंडारी, राजेश गावकर, दिपक नाईक, अल्का फळदेसाई व इतर कार्यकर्ते हजर होते. (Support BJP for a stable government G Kishan Reddy)

आतापर्यंत जे सर्वे झाले आहेत, त्यात सांगे मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकून येणार असल्याचे निश्चित झाले असून आमचा विजय शंभर टक्के पक्का झाला आहे. यासाठी आपण गाफील न राहता 14 तारीखपर्यंत काम करीत राहिले पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक घरांना तसेच मतदारांना भेट देऊन त्यांना भाजपाला का मतदान करावे, हे समजावून सांगण्याची गरज आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी पक्षावर विश्वास ठेवून आपले काम करीत राहावे.

या मतदारसंघातून परत एकदा कमळ फुलवावे, असे रेड्डी यांनी सांगितले.

खोट्या तक्रारी नको

आम्ही मतदारसंघात प्रचारात घेतलेली आघाडी पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली असून अमच्याविरुद्ध आता विरोधकांनी तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे, पण मी तसे आतापर्यंत केलेले नाही, पण जर तुम्ही अमच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करण्यास सुरूच ठेवल्या तर आम्हीही गप्प बसणार नाही. विरोधकांनी आम्हाला चिथावण्याचा प्रयत्न करू नये, आमचे कार्यकर्ते तुमच्या फसव्या राजकारणाला बळी पडणार नाहीत, यावेळी सांगेतून भाजपाच विजयी होणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT