Sunburn Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn 2023 Goa: ‘सनबर्न’ला पर्यटनची अखेर सशर्त परवानगी

Sunburn 2023 Goa: सुनिलकुमार आंचिपका यांची माहिती: अधिकाऱ्यांना महोत्सवस्थळी प्रत्यक्ष उपस्थित रहावे लागणार

दैनिक गोमन्तक

Sunburn 2023 Goa: ध्वनिप्रदूषणासह सर्व आवश्यक परवाने घेणे गरजेचे असल्याचे उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुनावल्यानंतर राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या ‘सनबर्न’ या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल’ला (ईडीएम) आज अखेर पर्यटन खात्याने परवानगी दिली आहे.

या सनबर्न महोत्सवाला डिसेंबर 28 ते 30 तारखेपर्यंत आयोजित करण्यास परवानगी दिल्याची माहिती पर्यटन विभागाचे संचालक सुनिलकुमार आंचिपका यांनी दिली.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने सनबर्न व उतर मोठ्या इव्हेंट्सना परवानगी देण्यासाठी विशेष विभाग स्थापन केला आहे.

हल्लीच सनबर्न विरोधात एका व्यक्तीने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.

महोत्सव आयोजकांना सर्व नियम, कायदे पाळण्यास आवश्यक असल्याचेही नमूद केले होते. आज सोमवारी प्रलंबित असलेली परवानगी पर्यटन विभागाकडून ‘सनबर्न’ आयोजकांना देण्यात आल्याची माहिती पर्यटन संचालकांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली.

परवानगी व्यतिरिक्त आयोजकांना कोणते नियम आणि कायदे पाळावे लागतील असे विचारले असता आंचिपका यांनी सांगितले, की गेल्यावर्षी जे नियम महोत्सवाच्या आयोजकांना पाळण्यास सांगितले होते, तेच नियम यावर्षीही पाळावे लागणार असल्याचे सांगितले व या विषयावर आणखी माहिती देणे संचालकांनी टाळले.

गोव्यातील वाढत्या ध्वनी, वायू प्रदूषणामुळे जनता त्रस्त झाली आहे. गेली अनेक वर्षे उत्तर गोव्यात वागातोर येथे होणाऱ्या ‘सनबर्न’ या ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल’ला तेथील काही स्थानिकांचा विरोध आता दिसून येत आहे.

वागातोर  येथील राजेश सिनारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सनबर्नविरोधात याचिका दाखल केली होती. तेव्हा खंडपीठाने सनबर्न आयोजकांनी कायद्याचे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद करत आयोजकांनी सर्व आवश्यक परवाने राज्य सरकारकडून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saptakoteshwar Temple History: शिल्पावशेषांतून उलगडतोय दिवाडीच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहास; कदंब स्थापत्याला नवा उजाळा

Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सुप्रीम कोर्टाचा 'MACP' संदर्भात महत्त्वाचा निर्णय

DJ Controversy: पुण्यात 'DJ'चा सवाल; गोव्यात नरकासुराचे काय?

Guru Gochar 2026: करिअरमध्ये मोठी झेप अन् छप्परफाड पैसा! गुरुच्या नक्षत्र परिवर्तनानं 4 राशी होणार मालामाल; गोल्डन टाईम सुरु

SCROLL FOR NEXT