Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: संशयित बाबूश मोन्सेरांतविरुद्धच्या खटल्यात दोन साक्षीदारांना समन्स

Babush Monserrate: राज्य सरकारातील महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात संशयित आरोपी असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणासंबंधीच्या खटल्यात मडगावच्या मुख्य सत्र न्यायालयाने दोन साक्षीदारांना या प्रकरणासंबंधी न्यायालयात साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्याचा बुधवारी आदेश दिला.

दैनिक गोमन्तक

Babush Monserrate: राज्य सरकारातील महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात संशयित आरोपी असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणासंबंधीच्या खटल्यात मडगावच्या मुख्य सत्र न्यायालयाने दोन साक्षीदारांना या प्रकरणासंबंधी न्यायालयात साक्ष देण्यासाठी समन्स बजावण्याचा बुधवारी आदेश दिला.

सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील व्ही.जी. कॉस्ता न्यायालयात उपस्थित होते. संशयित मोन्सेरात यांच्यावतीने गुरुवारी न्यायालयात ॲड. डी. धोंड हजर होते तर दुसरी संशयित महिला रुजारिया ऊर्फ रोजी फेर्रोस यांचे प्रतिनिधित्व ॲड. ए. कुडतरकर करीत होते.

बुधवारी झालेल्या खटल्याच्या सुनावणीच्यावेळी संशयित मंत्री बाबूश मोन्सेरात न्यायालयात उपस्थित नव्हते. न्यायालयाने त्यांना गैरहजर राहण्यास अनुमती दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने संशयित मोन्सेरात न्यायालयात गैरहजर होते.

पणजीच्या महिला पोलिस स्थानकात याप्रकरणी वरील दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३७६ (लैंगिक अत्याचार करणे), ३४२ (अडवणूक करणे), ५०६ (धमकी देणे) तसेच ‘पॉक्सो’ कायद्याच्या ४ कलमाखाली आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायद्याच्या ६७-ब (सी) कलमाखाली गुन्हा नोंद केलेला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT