PM Narendra Modi: घुमट हे गोमंतकीय वाद्य आहे आणि त्याची ओळख आता देशभर झाली आहे. तसेच ‘घुमट आरती’ हे गोव्याचे एक खास वैशिष्ट्य आहे. चतुर्थीच्या दिवसात ‘घुमट वादना’ला एक ग्लॅमर येतो. मात्र, अशा स्वामित्व हक्काच्या जाणिवेतून घुमट आपण आपल्याला हव्या तशा ‘तालात’ वाजवू शकतो.
या वाद्याची वेगळी ओळख आहे. गोव्याची ही ओळखी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घुमट आणि कुणबी शाल भेट दिली.
स्वयंपूर्ण फेरी; तानावडेंना मान
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेडियमवर प्रवेश केल्यानंतर त्यांनी ‘स्वयंपूर्ण फेरी’तून संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली व उपस्थित क्रीडाप्रेमींना अभिवादन केले. या फेरीसाठी खास रथ तयार करण्यात आला होता. या रथात नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनाही मान मिळाला. तानावडेंना मिळालेल्या या संधीबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
गोव्याचे स्वप्न पूर्ण : प्रमोद सावंत
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजिण्याचे गोव्याचे स्वप्न पूर्ण झाले. गोव्याला क्रीडा परंपरा लाभली असून ब्रह्मानंद शंखवाळकर, भक्ती कुलकर्णी यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. कात्या कुएल्होसारखे खेळाडू गोव्याचे नाव पुढे नेत आहेत. ‘स्पोर्ट्स हब’ अशी गोव्याची नवी ओळख साकार करू. खेळांबाबतच्या सर्व पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘जुडेंगे, जीयेंगे, जीतेंगे...’ ‘भारत माता की जय’ , ‘वंदे मातरम्’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सांगता केली.
कुएल्हो, हरमनप्रीतकडून मशाल सुपूर्द
गोव्याची आंतरराष्ट्रीय विंड सर्फर कात्या कुएल्हो आणि इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून खेळाडू हरमनप्रीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मशाल सुपूर्द केली. एका महिला कलाकाराने आकाशात झेपावत ही मशाल खाली आणले. हे चित्र पाहताना उपस्थितांचे मन वेधून घेतले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.