Goa Mango Dainik Gomantak
गोवा

Goa Mango Rate : आंब्याचे दर वाढले उष्म्याच्या चटक्यात महागाईचा भडका; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

Goa Mango Rate : बाजारात मानकुराद, हापूस, तोतापुरी, सेंदूरी असे विविध आंबे दाखल झाले आहेत. परंतु अजून हे आंबे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. मध्यम आकाराचा मानकुराद आंबा १०००- १५००- रुपये, हापूस आंबा ८०० रू. सेंदूरी २५० ते ३०० रुपये डझन दराने विकला जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mango Rate :

पणजी, राज्यात उन्हाच्या चटक्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा भडका देखील सोसावा लागत आहे. राज्यात वाढत्या उष्म्यामुळे, फळे तसेच पालेभाज्यांना वाढती मागणी आहे, परंतु अनेक फळभाज्यांच्या दराने शंभरी गाठली आहे.

राज्यातील बाजारपेठांमध्ये आता आंब्याची आवक वाढली आहे तरी देखील दर चढेच आहेत. आंब्याचे दर अजून सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. भाजीपाला तसेच फळभाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, त्यापासून बचावासाठी लोक लिंबू पाणी, सरबत, फळांचा रस, शीतपेयांकडे वळले आहेत. त्यामुळे लिंबू व इतर फळांच्या दरातही वाढ झाली आहे. उत्तम दर्जाचे मध्यम आकाराचा लिंबू आठ रुपये प्रतिनग विकला जात आहे.

बाजारात विविध प्रकारचे आंबे

बाजारात मानकुराद, हापूस, तोतापुरी, सेंदूरी असे विविध आंबे दाखल झाले आहेत. परंतु अजून हे आंबे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. मध्यम आकाराचा मानकुराद आंबा १०००- १५००- रुपये, हापूस आंबा ८०० रू. सेंदूरी २५० ते ३०० रुपये डझन दराने विकला जात आहे.

राज्यात सध्या आंब्याची आवक वाढली आहे मात्र अजून दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नसून आंबा अजून भाव खात आहे. छोट्या आकाराचे मानकुराद आंबे ६००-७०० रूपये डझन दराने विकले जात असून येत्या काही दिवसात आंब्यांच्या दरात घट होण्याची शक्यता आहे.

खुल्या बाजार भाजीचे दर फलोत्पादन दर

कांदा ४० २६

बटाटा ४० ३७

टोमॅटो ३० २५

गाजर ६० ४३

फ्लॉवर ४० २५

कोबी ४० २८

हिरवी मिरची ८०/१०० ६५

लिंबु २० ला ३

शिमला मिर्ची १००

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT