Death
Death Dainik Gomantak

Goa Crime News: व्हिडिओ कॉलवर बोलण्यास पत्नीचा नकार, उत्तर प्रदेशच्या युवकाने गोव्यात उचलले टोकाचे पाऊल

Goa Crime News: अमर शर्मा असे या युवकाचे नाव असून तो मूळ उत्तर प्रदेशमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

Goa Crime News

पत्नीने व्हिडिओ कॉलवर बोलण्यास नकार दिल्यामुळे बाळ्ळी येथे ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमर शर्मा असे या युवकाचे नाव असून तो मूळ उत्तर प्रदेशमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरु आहे.

कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर रोजगाराच्या निमित्ताने दीड महिन्यापूर्वी गोव्यात आला होता. एका सलूनमध्ये तो कामाला होता.

बुधवारी रात्री त्याने पत्नीला व्हिडिओ कॉल केला मात्र, पत्नीने कॉलवर बोलण्यास नकार दिला. याप्रकारामुळे रागवलेल्या अमरने टोकाचा निर्णय घेत राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

Death
PM Modi's Goa Visit: PM नरेंद्र मोदींच्या सभेला जाणार असेल तरच प्रवेश; सांकवाळमध्ये वाहतुकीत मोठा बदल

कुंकळ्ळी अग्निशमन दलाच्या जवांनी अमर राहत असलेल्या खोलीत प्रवेश करुन मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मिर्झापूर येथील रहिवासी अमर नागेंद्र शर्माला दोन मुले असल्याचे समजते. पत्नी आणि मुलांना गावी ठेऊन तो रोजगारासाठी गोव्यात गोव्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com