CCTV Visuals Showing Suleman Khan Escape From Jail Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: खळबळजनक! सुलेमान खानच्या पलायनाचा 3 कोटी रुपयांत झाला सौदा; मध्यस्थी कोण? गोव्यात रंगली चर्चा

Suleman Khan Escape: अमित याला या कामासाठी राजी करण्यासाठी कोणी मध्यस्थी केली असावी ते पोलिसांनी शोधून काढावे, अशी राज्यभरात चर्चा आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Suleman Khan Escape

पणजी: गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीतून पळालेल्या सुलेमान खान याने पळून जाण्यास मदत करण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा सौदा केला होता, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, त्याने हे पैसे पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप असलेला बडतर्फ पोलिस शिपाई अमित नाईक याला दिले की नाही, याची चौकशी आता पोलिस करत आहेत. सुलेमान याचा शोध शनिवार (१४ डिसेंबर) सायंकाळपर्यंत लागला नव्हता. मात्र, अमित नाईक याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीतून सुलेमान याला पळून जाण्यास मदत करण्यासाठी पोलिस शिपाई केवळ पैशाच्या आमिषापोटी तयार झाला का, याविषयी लोकांत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

आपल्याला कर्नाटकात नियोजित ठिकाणी सोडल्यावर तीन कोटी रुपये अदा करतो, असे सुलेमान याने अमित नाईक याला सांगितल्याचे सांगण्यात येत असले तरी ती बाब निश्चितपणे विश्वासार्ह नाही.

सुलेमानची बँक खाती गोठवली गेली आहेत, हे अमित नाईक याला माहीत नसण्याचे कारणच नाही. त्यामुळे तो तीन कोटी रुपये देईल, याची हमी कोणी घेतली? मुळात अमित याला या कामासाठी राजी करण्यासाठी कोणी मध्यस्थी केली असावी ते पोलिसांनी शोधून काढावे, अशी राज्यभरात चर्चा आहे.

सुलेमान गेली साडेतीन वर्षे पोलिसांना सापडत नव्हता. आता तर एवढ्या मोठ्या कर्नाटक राज्यातून त्याला शोधून काढणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे सुलेमानने पोलिसांच्या हातावर दिलेली तुरी तूर्त तरी कायमचीच, अशीही चर्चा कानावर पडत आहे.

बोलवित्या धन्याची चर्चा

भूबळकाव प्रकरणे ही राजकीय वरदहस्ताशिवाय होणारच नाहीत, असे ठाम मत याआधी अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सुलेमान याने तोंड उघडले तर या प्रकरणामागील बोलवित्या धन्याचा पर्दाफाश झाला असता. त्यामुळे सुलेमान हा जास्त दिवस कोठडीत राहणे अशांना परवडणारे नव्हते. त्यामुळे त्याला पळून जाण्याची संधी दिली गेली असावी, अशी चर्चा सुरू झाली आहे.

प्रश्न अद्याप अनुत्तरित

१) सुलेमान याला अमित याने कर्नाटकात कोठे नेऊन सोडले?

२) त्यासाठी त्याने दुचाकी की अन्य दुसऱ्या वाहनाचा उपयोग केला?

३) 3 तीन कोटी रुपयांचा सौदा कसा ठरला?

४) ती रक्कम अमित याला मिळणारी याची खात्री त्याला कोणी दिली?

५) तीन कोटी रुपयांपैकी किती रक्कम आगावू दिली गेली?

६) परिसर सीसीटीव्हीच्या नजरेखाली आहे याची कल्पना असूनही अमित याने हे धाडस का केले?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT