Big Update! सुलेमान खानला कोठडीतून फरार होण्यास मदत करणाऱ्या कॉन्स्टेबल नाईकचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Constable Amit Naik: जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्दीकी उर्फ सुलेमान याला तुरुंगातून पलायन करण्यास मदत करणारा आयआरबीचा कॉन्स्टेबल अमित नाईक हुबळी पोलिसांना शरण आला आहे.
Big Update! सुलेमान खानला कोठडीतून फरार होण्यास मदत करणाऱ्या कॉन्स्टेबल नाईकचे गोवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Constable Amit NaikDainik Gomantak
Published on
Updated on

जमीन हडप प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्दीकी उर्फ सुलेमान याला तुरुंगातून पलायन करण्यास मदत करणारा आयआरबीचा कॉन्स्टेबल अमित नाईक हुबळी पोलिसांना शरण आला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी सुलेमान अद्याप सापडलेला नाही.

नाईकला ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिस हुबळीला रवाना झाले आहेत. आरोपी सुलेमान खान आणि कॉन्स्टेबल अमित नाईक दोघेही दुचाकीवरुन फरार झाले होते. शुक्रवारी (13 डिसेंबर) सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

सुलेमान खान

सुलेमान खान (वय 55) विरोधात जमीन हडप प्रकरणासह इतर प्रकरणी देखील गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेने मोठ्या प्रयत्नानंतर 12 डिसेंबर रोजी त्याला अटक केली होती. गेल्या साडेचार वर्षापासून सुलेमान फरार होता. सुलेमानला गुन्हे शाखेच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याने आरोपी सुलेमानला 13 डिसेंबरच्या पहाटे अडीच वाजता कोठडीतून बाहेर काढले आणि दोघे नाईक याच्या यमाहा बाईकवरुन फरार झाले. त्यानंतर गोवा पोलिसांनी (Goa Police) या दोघांचा शोध सुरु केला होता.

Big Update! सुलेमान खानला कोठडीतून फरार होण्यास मदत करणाऱ्या कॉन्स्टेबल नाईकचे गोवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Viral Post: सुलेमानसाठी अमितने सूर्याजी पिसाळ व्हावे यासारखे दुर्दैव ते कोणते? गोव्यातील भाजपच्या माजी खासदाराची पोस्ट चर्चेत

शिस्तभंगाची कारवाई

कर्तव्यावर असणाऱ्या कॉन्स्टेबलने सुलेमान खान याला मदत केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी अहवाल दाखल केला जाईल. सुलेमानला विशेष वागणूक दिल्याचे आरोप खोटे आणि तथ्यहीन आहेत. दरम्यान, कोठडीची सुरक्षा पाहणारे अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची वरिष्ठांच्या मदतीने चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com