Goa Police Crimes Canva
गोवा

Goa Police: खाकी वर्दीवर काळे डागच जास्‍त! वर्षभरात 20 पोलिस निलंबित; फसवणूक, लाचखोरी, दादागिरीच्या घटना वाढल्या

Goa Police And Crime: ‘कायदा’ सर्वांसाठी समान असतो; पण कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच जेव्हा त्यात दुजाभाव करून ‘वरकमाई’साठी न्यायाचा बाजार मांडतात तेव्हा ‘कायदा’ फक्त शोभेची बाहुली बनून राहतो.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: ‘कायदा’ सर्वांसाठी समान असतो; पण कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच जेव्हा त्यात दुजाभाव करून ‘वरकमाई’साठी न्यायाचा बाजार मांडतात तेव्हा ‘कायदा’ फक्त शोभेची बाहुली बनून राहतो. आजकाल सर्रास ‘मनी पॉवर’मुळे अनेक आरोपी खुलेआमपणे समाजात मोकाट फिरताना दिसतात. सध्याची राज्यातील वाढती गुन्हेगारी पाहता एका दृष्टीने ‘पोलिस’ म्हणजे समाजाचे शत्रूच बनल्याची भावना जनमानसांत रुजू लागली आहे.

जमीन हडप प्रकरणातील मास्‍टर माईंड असलेला सुलेमान खान ऊर्फ सिद्दिकी याने आज क्राईम ब्रँचच्‍या कोठडीतून पलायन केल्‍याने सर्व पोलिस खाते हादरून गेले आहे. या पलायनाला एका आयआरबी कॉन्‍स्‍टेबलची साथ असल्‍याचे सांगण्‍यात येत असून त्‍यामुळे गाेवा पोलिसांचे काळे कारनामे पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहेत. चालू वर्षभरात पोलिसांच्‍या खाकी वर्दीवर काळे डागच जास्‍त असल्‍याच्‍या अनेक घटना उघडकीस आल्‍या असून वेगवेगळ्‍या कारणांमुळे जानेवारी ते आजपर्यंत तब्‍बल २० पाेलिसांना निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्‍यातील दोघांना पोलिस सेवेतून बडतर्फही केले आहे.

फसवणूक, लाचखोरी, दादागिरी, पर्यटकांना लुटणे, पर्यटन व्‍यावसायिकांकडून खंडणी उकळण्‍याचा प्रयत्‍न करणे असे अनेक गुन्‍हे या पोलिसांच्‍या नावावर जमा झाले आहेत. यंदा जे पाेलिस अधिकारी निलंबित झाले त्‍यात दोन पोलिस निरीक्षक, तीन उपनिरीक्षक, दोन साहाय्‍यक पोलिस उपनिरीक्षक, सहा हवालदार तर सात पोलिस शिपायांचा समावेश आहे. त्‍याशिवाय आपली ड्युटी व्‍यवस्‍थितपणे पार न पाडल्‍याने दोन पोलिस निरीक्षकांची दुसरीकडे बदली करण्‍यात आली तर एका महिलेला स्‍वत:चे बूट चाटण्‍यास लावणाऱ्या एका उपनिरीक्षकालाही दुसरीकडे बदली करून त्‍याची पोलिस खात्‍यांतर्गत चाैकशी सुरू झाली आहे.

खाकी वर्दीवरील काळ्‍या डागांची मालिका जानेवारीपासून सुरू झाली असून यंदाची अशी पहिली घटना २८ जानेवारी रोजी माशेल येथे घडली होती. हवालदार समीर फडते आणि अन्‍य दोन पोलिसांनी माशेलमधील एका रेस्‍टॉरंट व्‍यावसायिकांवर हल्‍ला चढविण्‍याची घटना सर्वांसमक्ष घडली होती. व्‍यावसायिक वैमनस्यातून हा हल्‍ला झाल्‍याचे त्‍यावेळी सांगण्‍यात आले होते. या काळ्या डागांच्‍या कुकर्मांत फक्‍त पुरुष पोलिस कर्मचारीच आहेत, असे नसून महिलांचाही त्‍यात समावेश आहे. ही घटना २३ मार्च रोजी उघडकीस आली. एका लाचखोरीच्‍या प्रकरणात एका महिला पोलिस साहाय्‍यक उपनिरीक्षकासह अन्‍य दाेन पोलिसांना निलंबित करण्‍यात आले होते.

एप्रिल महिन्‍यात अशी घटना घडली की ज्‍यात एका दिल्‍लीच्‍या व्‍यावसायिकाकडून खंडणी वसूल करण्‍याच्‍या प्रयत्‍नात वास्‍को रेल्‍वे पोलिस स्‍थानकातील हवालदार विनायक कोळमकर आणि पाेलिस शिपाई आनंद नाईक या दोघांचा हात असल्‍याचे उघडकीस आल्‍यानंतर त्‍यांना निलंबित करण्‍यात आले होते. या प्रकरणाची माहिती अशी की, गोव्‍यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना जमीन व्‍यवहाराचा सौदा करण्‍यासाठी दिल्‍लीतून आलेल्‍या एका व्‍यावसायिकाला त्‍याने बेकायदेशीर रक्‍कम आणल्याचा दावा करून निवडणूक आयोगाच्‍या एका अधिकाऱ्याने त्‍या व्यावसायिकाला अडवून त्‍याच्‍याकडून खंडणी मागितली. या प्रकरणात वरील दोन पोलिसांनी त्‍यांना साथ दिल्‍याचे उघडकीस आले होते.

एप्रिल महिन्‍यातच आणखी दोन पोलिसांचे अशाचप्रकारचे कारनामे उघडकीस आले. तेरेखोल येथील पॅराग्‍लायडिंग करणाऱ्या व्‍यावसायिकांकडून हप्‍ता मागण्‍याच्या आरोपावरून पाेलिस निरीक्षक विदेश पिळगावकर आणि हवालदार संजय तळकर या दोघांवर निलंबनाची वेळ आली. त्‍यानंतर त्‍यांच्‍यावर कारवाईही झाली. एप्रिल महिन्‍यातच आणखी एका पोलिस उपनिरीक्षकाचे द्विभार्या प्रकरण उघडकीस आल्‍याने पुन्‍हा एकदा पोलिस दलाला लाजेने मान खाली घालावी लागली. ज्‍या पोलिसांकडे महिलांवर झालेले अत्‍याचार नियंत्रणात आणण्‍याचे काम असते त्‍या पोलिसानेच महिलांवर अत्‍याचार केल्‍याचे उघडकीस आले. सांगेचा पोलिस निरीक्षक नारायण पिंगे हा स्‍वत: लग्‍न झालेला असताना आणखी एका महिलेशी संबंध ठेवून तिला आणि तिच्‍या वृद्ध पालकांना ८ लाख रुपयांना लुटण्‍याच्‍या आरोपाखाली त्‍याच्‍यावर गुन्‍हाही नोंद करण्‍यात आला.

पोलिसाचा पोलिसावरच हल्‍ला

पोलिस पोलिसांवरच हल्‍ला करतात हे प्रकरण ११ सप्‍टेंबर रोजी घडलेल्‍या घटनेतून उघड झाले. फाेंडा पोलिसांच्‍या वाहतूक विभागातील साहाय्‍यक उपनिरीक्षक विवेक फडते याच्‍यावर वास्‍काेचा पोलिस शिपाई प्रज्‍याेत आडपईकर याने हल्‍ला करण्‍याची घटना घडली. या प्रकरणात नंतर प्रज्‍योतला निलंबित करून त्‍याला बडतर्फही करण्‍यात आले.

खोटा शैक्षणिक दाखला देऊन पाेलिसाची नाेकरी मिळविल्‍याबद्दल कुडचडे पोलिस स्‍थानकाच्‍या एका पोलिस शिपायाला असेच बडतर्फ करण्‍यात आले. हल्‍लीचीच गोष्‍ट म्‍हणजे, दिल्‍लीहून आलेल्‍या काही पर्यटकांशी बेइज्‍जतीने वागल्‍याबद्दल पोलिस अधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी हणजूण वाहतूक पोलिस विभागाच्‍या एक साहाय्‍यक उपनिरीक्षक, एक हवालदार व एका शिपायाला निलंबित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT