Suleman Khan Escape Case Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan Arrest: 14 पथके, 70 पोलिस, 3 राज्ये; वाचा 'सुलेमान'च्या अटकेचा घटनाक्रम

Suleman Khan Escape Case: सुलेमान खान याच्याविरुद्ध गोव्यात व गोव्याबाहेर मिळून १३ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये गोव्यातील ७, तेलंगणा ४, दिल्ली १ व कर्नाटकमध्ये एका गुन्ह्यांचा समावेश आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Suleman Khan Arrested By Goa Police

पणजी: सुलेमान खान याच्याविरुद्ध गोव्यात व गोव्याबाहेर मिळून १३ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये गोव्यातील ७, तेलंगणा ४, दिल्ली १ व कर्नाटकमध्ये एका गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याचे चार फ्लॅट तसेच कारवार, केरळ व कर्नाटक येथील कार्यालये सील केली आहेत, अशी माहिती पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्‍‍नोई, उपमहानिरीक्षक वर्षा वर्मा, पोलिस अधीक्षक राहुल गुप्‍ता तसेच कारवाईमध्‍ये सहभागी इतर पोलिस अधिकारी उपस्‍थित होते.

सुलेमानच्‍या केरळमधील फ्लॅट व कार्यालयातून अनेक दस्तावेज जप्त केले आहेत. त्याच्या व त्याच्या पत्नीच्या नावे अधिकृत विक्रीखत करार दस्तावेज, ३ स्टॅम्प पॅड्स व २ इंक रबर स्टॅम्प्स, २४ मोबाईल फोन, २ लॅपटॉप, १ टॅब, १ टाइपरायटर, १६ बँक पासबुक व ३० चेकबूक, आधार कार्ड, शिधापत्रिका, मोटार वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, ३ चारचाकी व ३ दुचाकी वाहने तसेच २ लाख ६६ हजार ३०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

आठ ठिकाणे बदलली

पोलिस कोठडीतून पलायन केल्यानंतर सुलेमान हुबळीला गेला. पोलिस मागावर असल्याने तो कर्नाटक, महाराष्ट्र व केरळ या राज्यामध्ये ठिकाणे बदलत होता.

त्याच्या शोधार्थ १४ पोलिस पथके स्थापन करण्यात आली होती व अधिकाऱ्यांसह ७० पोलिस कर्मचारी काम करत होते. त्याने पलायनानंतर हुबळी, बंगलोर, उत्तर कन्नडा, पुणे, मुंबई, गोवा व केरळ या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न केला होता.

त्याच्या संपर्कात असलेल्या नातेवाइकांचा शोध घेत तसेच सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने त्याचा मागोवा घेण्यात आला होता. तो केरळमधील एर्नाकुलम येथील नातेवाइकांच्या घरात असल्याची माहिती मिळाल्यावर ती केरळ पोलिसांना देण्यात आली.

त्यांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. केरळ पोलिसांच्या ताब्यातून काल त्याला अटक करून आज गोव्यात आणण्यात आले, असे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.

पत्‍नीच्‍या नावे अनेक मालमत्ता व कंपनी

सुलेमान महंमद खान ऊर्फ सिद्दीकी याच्या जमीन हडप घोटाळ्यामध्ये त्याची पत्नी अफसाना ऊर्फ सारिका खान हीसुद्धा सामील होती. म्हापसा पोलिस स्थानकात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये ती संशयित आहे. त्यामुळे तिलाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याने हडप केलेल्या जमिनीमधून मिळालेल्या पैशातून कर्नाटकमध्ये काही फ्लॅट्स व मालमत्ता तिच्या नावावर घेतल्या होत्या. त्याने मे. सिदसारिका हिलाईट बिल्डर्स ग्रुप नावानेही कंपनी सुरू केली होती, अशी माहिती पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. दरम्यान, अफसाना हिला एसआयटीची चार दिवसांची कोठडी मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team Fixing: यांना लाज कशी वाटत नाही? पाकिस्तानी खेळाडूंवर मॅच-फिक्सिंगचे गंभीर आरोप! PCB ने सुरु केली चौकशी

Crime News: हा नवरा आहे की सैतान? पत्नीची बोटं कापली, शीर धडावेगळं करुन फ्रिजमध्ये ठेवलं, मृतदेह खोलीतच सडत ठेवला; 25 वर्षीय 'रिया'ची निर्घृण हत्या

Dwidwadash Yog 2026: ग्रहांचा राजा अन् देवांचे गुरु एकत्र! 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; द्विद्वादश दृष्टी योगाचा मोठा चमत्कार

U20 Asian Cup 2027: दोन दशकांचा दुष्काळ अखेर संपला! 20 वर्षांच्या वनवासानंतर टीम इंडियाची 'एएफसी आशिया कप'मध्ये दिमाखदार एन्ट्री

Aitar Worship Traditional: 'आयतार पूजन' गोवा-कोकणची लोकपरंपरा आणि निसर्गाचं अतूट नातं!

SCROLL FOR NEXT