Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

कितीही आमिषे दाखविली तरी 'मगो' सोडणार नाहीच: सुदिन ढवळीकर

दैनिक गोमन्तक

फोंडा: मगो पक्ष हा माझा श्‍वास आणि ध्यास आहे. भाऊसाहेबांच्या मगो पक्षाने गोव्याला समृद्ध करण्यासाठी योगदान दिले आहे. कितीही आमिषे दाखविली तरी या पक्षाचा त्याग करणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मगोपचे नेते तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. काशीमठ-बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर आज सहाव्यांदा निवडून दिल्याबद्दल मतदारांसाठी ऋणनिर्देश कार्यक्रमाचे आयोजन मगोप आणि आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले होते.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, दामोदर नाईक, प्रिया च्यारी, ढवळीकर ट्रस्टचे मिथिल ढवळीकर, बांदोडाचे सरपंच राजेश नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, मडकईच्या सरपंच लक्ष्मी वळवईकर, कुंडईचे सरपंच विश्‍वास फडते, वाडी-तळावलीचे सरपंच दिलेश गावकर तसेच इतर पंचसदस्य व मगोपचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ढवळीकर म्हणाले, प्रतापसिंह राणे यांनी मला काँग्रेसमध्ये प्रवेशाचे निमंत्रण दिले होते, त्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी सुचवले होते. मुख्यमंत्रिपदाची ऑफरही आली. पण मी मगोपशी एकनिष्ठ राहिलो आणि यापुढेही राहणार. यावेळी गणपत नाईक, राजेश कवळेकर, राजेश नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत मिथिल ढवळीकर, सूत्रसंचालन शशिकांत नागेशकर तर सलोनी गावडे यांनीआभार मानले

‘पोगो’ ला विरोधच

सध्या ‘उजो’ हा शब्दप्रयोग वारंवार वापरला जात आहे. आग लागली तर ती शमवण्याची आधीच तयारी ठेवा, असे सांगत ‘पोगो’ बिल संमत होणे मुश्‍कील असल्याचे ढवळीकर म्हणाले. गोमंतकीय युवक आज इतरत्र नोकरीसाठी जातात. तसेच तेथील लोक येथे येतात. त्यात भेदभाव करणे सोपे नाही, असे ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT