गोव्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटपासाठी विलंब

फळदेसाई यांचा उपसभापतिपदाचा राजीनामा
Delay in Cabinet allocation in goa
Delay in Cabinet allocation in goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्‍तार आज शनिवारी अखेर पार पडला. भाजपचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई आणि मगोचे मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांना राज्‍यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्‍यमंत्र्यांच्‍या उपस्‍थितीत दुपारी 12 वाजता राजभवनवर नव्‍याने उभारलेल्‍या दरबार हॉलमध्‍ये हा शपथविधी सोहळा पार पडला. आता मंत्रिपदे मिळाली असली तरी खाती कधी मिळणार, हा प्रश्‍‍न अनुत्तरीतच आहे. खातेवाटपासाठी विलंब होणार असल्‍याचे संकेत प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिले आहेत.

28 मार्च रोजी झालेल्‍या मंत्रिमंडळाच्‍या शपथविधी सो‍हळ्‍यात केवळ भाजपच्‍या (BJP) 8 मंत्र्यांना मंत्रिपदे देण्‍यात आली होती. तर, रिक्त 3 जागांपैकी 2 जागांवर भाजपने आपल्‍या आमदारांची वर्णी लावली असून केवळ एक मंत्रिपद मित्रपक्ष असलेल्‍या मगोला दिले आहे. मंत्रिमंडळाचा कोटा आता पूर्ण झाल असला तरी प्रतीक्षा खातेवाटपाची आहे. यासाठी आणखी काही दिवस जातील, असे समजते.

Delay in Cabinet allocation in goa
'तो' खटला चालवण्याची शेवटची संधी, दयानंद नार्वेकरांच्या अडचणीत वाढ

विधानसभा निवडणुकीत (Assembly election) भाजपला 20 जागा मिळाल्‍या असून मगोचे 2 आणि अपक्ष 3 असे एकूण 25 आमदारांचे संख्‍याबळ लाभलेल्‍या सरकारच्‍या (Government) मंत्रिमंडळात मगोपला एक मंत्रिपद मिळाले असले तरी अपक्षांना प्रत्‍यक्ष सत्तेत सामावून घेण्‍यापासून दूरच ठेवले आहे. पुढील आठवड्यात त्‍यांना महामंडळे देण्‍यात येतील, अशी माहिती आहे. 28 मार्च रोजी झालेल्‍या मंत्रिमंडळाच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यात शपथविधी सोहळ्‍यानंतर 3 एप्रिलला तब्‍बल आठवड्यानंतर खातेवाटप जाहीर करण्‍यात आले होते. आता या दुसऱ्या टप्‍प्‍यातील मंत्र्यांना आपल्‍या खात्‍यांसाठी किती दिवस वाट पाहावी लागणार, हा चर्चेचा विषय आहे.

फळदेसाई यांचा उपसभापतिपदाचा राजीनामा

मंत्रिमंडळाच्‍या विस्‍ताराच्‍या आजच्‍या दुसऱ्या टप्‍प्‍यात सुभाष फळदेसाई यांना आज मंत्रिमंडळात सामावून घेण्‍यात आले. 30 मार्च रोजी त्‍यांची विधानसभेचे उपसभापती म्‍हणून निवड करण्‍यात आली होती. मात्र त्‍यांना मंत्रिमंडळात सामावून घेणार असल्‍याचे जाहीर केल्‍याने आज सकाळी आपल्‍या पदाचा त्‍यांनी राजीनामा विधानसभा सचिव नम्रता उलमन यांच्‍याकडे सादर केला. विधानसभेच्‍या येत्‍या अधिवेशनात नव्‍याने उपसभापतींची निवड केली जाईल. या पदासाठी गणेश गावकर, आलेक्‍स रेजिनाल्‍ड यांच्‍या नावांची चर्चा आहे.

पक्षाने दिलेल्‍या आदेशानुसार मंत्रिमंडळाचा विस्‍तार केला असून, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या नेतृत्‍वाखालील भाजप स्‍वच्‍छ आणि पारदर्शी सरकार देईल. ज्‍यामध्‍ये सामान्‍य माणसाच्‍या विकासाबरोबरच राज्‍याच्‍या नावलौकीकात भर पडेल. आता मंत्रिमंडळाचा (Cabinet) पूर्ण विस्‍तार झाला असून आठवडाभरात नव्‍या मंत्र्यांना खाती मिळतील. अस मत मंत्री सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले आहे.

मतमोजणीनंतर या सरकारला आम्‍ही बिनशर्त पाठिंबा दिला होता. भाजपच्‍या केंद्रीय नेत्‍यांनी आपल्‍याला सत्तेत सामावून घेतले जाईल, असे सांगितले होते. त्‍यानुसार आज आपल्‍याला मंत्रिपद मिळाले आहे. आपण संग्रहालयपासून सार्वजनिक बांधकाम खात्‍यापर्यंतची पदे सांभाळली आहेत. त्‍यामुळे मिळणाऱ्या नव्‍या खात्‍यांनाही न्‍याय देईन. अस मत मंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com