Goa Medical College Hospital Dainik Gomantak
गोवा

गोमेकॉ प्रवेशद्वारासमोरील ‘सब-वे’ मृत्यूचा सापळा

अनेक रस्त्यांमुळे चालकांत गोंधळ

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या ‘सब-वे’ जंक्शनला अनेक रस्ते जोडले गेले असल्याने तो वाहतुकीसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. उड्डाण पुलाच्या बाजूने सबवेकडे जाण्यासाठी असलेले अंतर्गत रस्ते वाहनचालकांना बुचकळ्यात टाकत आहेत. या ठिकाणी वाहनांसाठी दिशाफलक नसल्याने किरकोळ अपघात घडण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत घडले असल्याने हे अंतर्गत रस्ते धोकादायक बनले आहेत.

गोमेकॉ इस्पितळाच्या प्रवेशद्वाराबाहेर बेकायदेशीपणे व्यापार करत असलेल्या भाजी - फळे विक्रेत्यांना व स्टॉलधारकांना हटवण्यात येऊन तेथील जागा पार्किंगसाठी तसेच सर्व्हिस रस्त्यासाठी वापरण्यात आली आहे. बांबोळी व पणजीहून गोमेकॉ इस्पितळाकडे येणारी व जाणारी तसेच दोनापावला येथून बांबोळीच्या दिशेने वाहनांसाठी उड्डाण पुलाच्या बाजूने सर्व्हिस रस्ते करण्यात आले आहेत. मात्र, तेथे अनेक रस्ते असल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. समोरून एखादी प्रवासी बस आली तर सर्व्हिस रस्त्यावर दुचाकी चालकालाहा रस्त्याच्या बाजूने वाहन घेताना कसरत करावी लागते. ज्या ठिकाणी सबवे आहे तेथून येणारी वाहने अंतर्गत रस्त्यावर येत असल्याने चालकांना अंदाज येत नाही.

बांबोळी येथील उड्डाण पुलावरून सांताक्रुझच्या जुन्या रस्त्याकडे जाणारी वाहने तसेच अंतर्गत सर्विस रस्त्याने पणजीला उड्डाण पुलावरून जाण्याच्या ठिकाणी समोरून आलेले वाहन कोणत्या दिशेने जाणार याचा अंदाज येत नाही. वाहनांना एलईडी लाईट असल्याने हा उजेड वाहनचालकांच्या डोळ्यावर प्रखर होत असल्याने समोरून आलेले वाहन कोणत्या प्रकारचे आहे याचा अंदाज न आल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन उभे करण्याची पाळी येते. या सबवे जंक्शनमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होणार असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी दिल्या होत्या मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याकडे कोणतेच लक्ष दिले नाही. माजी आमदार टोनी फर्नांडिस यांनी प्रयत्न केले होते मात्र, सध्या ते सत्तेत नसल्याने त्यांनीही त्याकडे कानाडोळा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Case: शिरवईकरला बडतर्फ करून अटक करा, 'आप'ची मागणी; मारहाणीत जखमी एडबर्गची प्रकृती गंभीरच

IFFI 2025: सिनेरसिकांसाठी 'इफ्फी'चा मेजवानी मोसम सुरू, पत्रकारांसाठी 'चित्रपट रसग्रहण' अभ्यासक्रम; 'FTII'चे आयोजन

World Cup 2025 Semifinal: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास 'या' संघाला मिळणार फायनलचं तिकीट, नियम वाचा

Goa Crime: बालकांवरील अत्याचारप्रकरणी हेमंत दास दोषी, बालन्यायालयाचा निवाडा; 2 मुलांना बनवले होते वासनेची शिकार

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतीसाठी 'बॅलेट पेपर'चा वापर, पाच कोटींचा होणार खर्च; मतदारयादीत नवी नावे जोडणे स्थगित

SCROLL FOR NEXT