Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar Dainik Gomantak

'काणकोणचे रवींद्र भवन 19 डिसेंबरपर्यंत पूर्ण'

सभापती तवडकर यांचा विश्‍वास
Published on

काणकोण: काणकोणमधील रवींद्र भवन 19 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा विश्वास सभापती रमेश तवडकर यांनी व्यक्त केला आहे. 2023 मध्ये ते वापरण्यास योग्य होणार आहे. सभापतींच्या या घोषणेमुळे स्थानिक कलाकारांनी समाधान व्यक्त केले आहे.

सध्या रवींद्र भवनाच्या इमारतीच्या ढाच्याचे काम पूर्णत्वास येत आहे. मात्र, अंतर्गत सजावट, आसन व्यवस्था, रंगमंच, आवाज यंत्रणा यासारखी कामे करण्यासाठी कालावधी लागणार आहे. 2 जानेवारी 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या रवींद्र भवन प्रकल्पाची पायाभरणी करून कामाला सुरवात केली होती. दोन वर्षांच्या कालावधीत म्हणजे 1 जानेवारी 2019 मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात बांधकाम संथ गतीने सुरू होते. यासंदर्भात सभापती तवडकर यांना विचारले असता कोरोना महामारीमुळे भवनाच्या बांधकामावर परिणाम झाला. आता जलदगतीने काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

Ramesh Tawadkar
'गोवा खंडपीठ जो निर्णय देईल तो मला मान्य असेल'

62 कोटी 30 लाख 83 हजार चौदा रुपयांची निविदा जारी केली होती. मात्र, कंत्राटदाराने हे काम 59 कोटी 27 लाख 55 हजार 740 रूपयांना स्वीकारले. रवीद्र भवनाचे कंत्राटदार कृष्णा बिल्डर्स आहेत. रवींद्र भवन प्रकल्पात 800 आसन व्यवस्था असलेले प्रेक्षकागृह, तालीम सभागृह, आर्ट गॅलरी, संगीत, नृत्य आणि नाट्य यासाठी स्वतंत्र वर्ग खोल्या, पाहुण्या कलाकारांसाठी गेस्ट रूम, कॅफेतारिया, प्रशासकीय ब्लॉक आणि अन्य सोयी या रवींद्र भवनात निर्माण करण्यात येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com