साखळी: गोव्यातील थिएटर्स अभ्यास करण्यासारखी आहेत. २०२० साली ‘अश्रूंची झाली फुले’चे साखळी रवींद्र भवनच्या थिएटरमध्ये सादरीकरण केल्यानंतर मनाला मोठी प्रसन्नता व समाधान वाटले होते. आजच्या नवीन पिढीने तसेच कलाकारांनी आपल्या भूमीचा सर्वप्रथम आदर राखावा. या भूमीत निर्माण झालेल्या कलाकारांची प्रेरणा सदैव मनात ठेवून अभिमानाने वाटचाल करावी, असा संदेश मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी दिला.
साखळी रवींद्र भवनात ‘गप्पा गोष्टी’ कार्यक्रमासाठी सुबोध भावे आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वरील भावना व्यक्त केली. ते म्हणाले, पाच वर्षापूर्वी साखळीतील थिएटरमधील ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजना यांचा तपशील घेऊन पुणेच्या महानगरपालिका आयुक्तांना मी पाठवले होते.
पुण्यातील अशा पद्धतीच्या थिएटर्स साकाराव्या अशी विनंती आपण त्यावेळी आयुक्तांना केली होती. गोव्यातील रवींद्र भवनमध्ये काम करायला मोठा आनंद मिळतो. विशेषतः साखळी रवींद्र भवनच्या अंतर्गत भागात रवींद्र भवनने लावलेला गोव्यातील महिला कलाकार म्हणजेच स्त्री शक्तीचा परिचय ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे.
गोवा ही कलाकारांची खाण आहे. या प्रदेशात मोठे मोठे दिग्गज कलाकार जन्माला आले. ज्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटविला.
माझे गोव्याशी जवळचे नाते आहे. कारण पं. जितेंद्र अभिषेकी हे आपले गुरू असून त्यांचे पुत्र शौनक अभिषेकी हे आपले जवळचे मित्र आहेत. गोव्यात येऊन सादरीकरण करण्यासाठी आम्ही तर निमित्त शोधत असतो. येथे सादरीकरण करण्यात मोठा आनंद मिळतो. कारण येथील रसिक-प्रेक्षकही तितकेच दर्दी व समोरच्या कलाकाराला चांगली साथ व प्रोत्साहन देणारे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.