Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Gujarat cabinet resignation: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळता विद्यमान मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी गुरुवारी राजीनामे दिले
CM Bhupendra Patel
CM Bhupendra PatelDainik Gomantak
Published on
Updated on

गांधीनगर: गुजरातमध्ये शुक्रवारी होणाऱ्या मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळता विद्यमान मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आज (गुरुवारी) राजीनामे दिले आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गुजरात मंत्रिमंडळात 'मेजर सर्जरी' करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १६ सदस्यसंख्या असलेले विद्यमान मंत्रिमंडळ वाढवून २६ सदस्यांचे केले जाणार आहे.

राजीनामा देणाऱ्यांपैकी केवळ सात ते दहा मंत्र्यांनाच मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता आहे, तर उर्वरित सर्व पदे नवीन चेहऱ्यांनी भरली जाणार आहेत. पुन्हा संधी मिळणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे राज्यपालांकडे न पाठवण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आज रात्री राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन औपचारिकपणे राजीनामे सादर करतील.

CM Bhupendra Patel
Goa Politics: रवि यांच्या जागी कोण? 6 महिन्यांत पोटनिवडणूक, 'मगो'चा पाठिंबा पुत्र रितेशला

केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी

नवीन गुजरात मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) सुनील बन्सल आणि मुख्यमंत्री पटेल यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाली, ज्यात प्रत्येक मंत्र्याला वैयक्तिकरित्या भेटी देऊन राजीनामे घेण्यात आले.

आगामी आव्हाने आणि जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी नगरपालिका निवडणुका आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ही पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्या टीममध्ये युवा आणि अनुभवी नेत्यांचे मिश्रण असेल, तसेच सर्व समुदायांमध्ये जातीय समतोल राखण्याचे उद्दिष्ट आहे.

आप (AAP) पक्षाचा वाढता प्रभाव, विशेषत: लेउवा पाटीदार समाजात वाढत असताना, जातीय गणिते संतुलित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २०२७ च्या निवडणुकांपूर्वी पक्षामध्ये नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण करण्याचा भाजपचा हा मोठा डाव आहे.

संभाव्य चेहरे आणि अंतर्गत नाराजीची शक्यता

आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नव्या मंत्र्यांची नावे अंतिम करण्यासाठी बैठक होणार आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आधीच गांधीनगरमध्ये दाखल झाले आहेत. सौराष्ट्र भागात जिथे 'आप' आपली पकड मजबूत करत आहे, तेथील युवा आमदार रिवाबा जडेजा, जयेश रादडिया आणि उदय कांगड यांसारखी नावे मंत्रिमंडळात जाण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आणि गुजरातच्या लोकसंख्येपैकी २४% असलेले कोळी समाजाचे प्रमुख नेते अल्पेश ठाकोर यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरोधी पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास पक्षातील जुने सदस्य आणि विद्यमान आमदारांमध्ये अंतर्गत नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com