
Bengaluru Traffic Police Video: बंगळुरुमध्ये एका वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, ज्यात तो कथितरित्या एका बाईकस्वाराला विनाकारण थप्पड मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, पोलिसांच्या जबाबदारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एका वाटसरुने हा व्हिडिओ (Video) रेकॉर्ड केल्याचे सांगण्यात येत आहे. क्लिपमध्ये हा पोलिस बाईकस्वाराला थप्पड मारताना स्पष्टपणे दिसत आहे. मात्र त्यांच्यात कोणत्या कारणावरुन वाद झाला हे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ @karnatakaportf नावाच्या हँडलवरुन 'एक्स' वर शेअर करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. यावर उत्तर देताना डीसीपींनी 'एक्स'वर लिहिले, "जबाबदारी आणि सन्मान हातात हात घालून चालतात. गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे."
डीसीपींनी यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केला की, संबंधित कर्मचाऱ्याला पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
दुसरीकडे, या घटनेनंतर लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेकांनी केवळ निलंबन का, त्याला गुन्हेगारी प्रकरणात अटक का केली नाही, असा सवाल विचारला.
एका युजरने लिहिले, "निलंबित? त्याच्यावर त्वरित गुन्हेगारी गुन्हा दाखल करुन त्याला तुरुंगात टाकले पाहिजे. जर एखाद्या नागरिकाने पोलिसाला थप्पड मारली, तर त्याला थेट जेल होते. मग यात काय फरक आहे?"
@blrcitytraffic ला टॅग करुन एका युजरने म्हटले, "व्यस्त वेळेत चुकीच्या दिशेने येणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध, टँकर आणि जड वाहनांविरुद्ध देखील हेच धाडस दाखवा. कठोर कारवाईची अपेक्षा आहे."
तसेच, अनेक टीकाकारांनी या घटनेला "वर्दीतील गुंडगिरी" असे संबोधले. पीसी मल्लिकार्जुन नावाच्या सोशल मीडिया युजरने लिहिले, "ट्रॅफिक थांबवणाऱ्याने नागरिकांना (Citizens) थप्पड मारणे? ही पोलिसिंग नाही, ही वर्दीतील गुंडगिरी आहे! त्याला त्वरित निलंबित करा. समान कायद्याचा अर्थ असा आहे की, पोलिसांना केवळ दंड नाही, तर शिक्षाही मिळेल. बॉडीकॅम अनिवार्य करा किंवा असेच आणखी थप्पड व्हायरल होण्याची वाट पाहा?"
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.