Goa dairy Dainik Gomantak
गोवा

गोवा डेअरीच्या आमसभेत येणार 'ऑडिटचा' विषय

दूध उत्पादकांची आज भूमिका ठरणार महत्त्वाची

दैनिक गोमन्तक

फोंडा: राज्यातील दूध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या गोवा डेअरीची बुधवारी 27 रोजी आमसभा बोलावण्यात आली असून या आमसभेत विशेषतः लेखा अहवालावरून वादळी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कुर्टी - फोंडा येथील सहकार भवनमध्ये सकाळी दहा वाजता ही आमसभा होणार आहे.

गोवा डेअरीच्या लोकनियुक्त संचालक मंडळाला न्यायालयीन बडग्यामुळे पदच्च्यूत केल्यानंतर आतापर्यंत प्रशासक झाले. 2018 पासून मध्यंतरीचा केवळ चार महिन्यांचा कालावधी सोडला तर अजूनही सरकारी प्रशासकामार्फत गोवा डेअरीचे कामकाज सुरू आहे.

मध्यंतरीच्या काळात दुर्गेश शिरोडकर यांना प्रशासकीय मंडळावर अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यानंतर या मंडळाने काही धोरणात्मक निर्णय घेतले, तरीही गोवा डेअरीची वाटचाल तशी समृद्धीकडे आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल, असे दूध उत्पादकांचेच म्हणणे आहे.

आमसभेत डेअरीचा 2018 ते 2019 सालचा लेखा अहवाल अर्थातच ऑडिट तपासणी ही आमसभेने नियुक्त केलेल्या लेखापालाकडूनच करण्यासंबंधी ठराव झाला होता, पण गोवा डेअरीच्या प्रशासकांनी हा ठराव डावलून दुसऱ्या लेखापालाकडून ऑडिट करवून घेतले. मात्र हे ऑडिट दूध उत्पादक सदस्यांना मान्य नाही. त्यातच आता 2020-21 चे ऑडिट मांडण्यात येत असल्याने मागचे ऑडिट व्यवस्थित झाले नसल्याने पुढील ऑडिटला कशी काय मान्यता द्यायची असा सवाल दूध उत्पादकांनी केला आहे. त्यामुळे या आमसभेत ऑडिटचा प्रश्‍न प्रामुख्याने येईल हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT