Fr. Victor Ferrao Dainik Gomantak
गोवा

सुभाष वेलिंगकर दुसरे इन्क्विझिशन आणू पाहात आहेत : फा. व्हिक्टर फेर्रांव

'शेकडो वर्षांपूर्वी सेंट फ्रान्सिस झेवियर हे काळाशी सुसंगत वागले'

दैनिक गोमन्तक

पणजी: सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांना ‘गोंयचो सायब’ म्हणू नका, अशा तऱ्हेचा सुभाष वेलिंगकर यांनी चालविलेला प्रचार हा धार्मिक भावना दुखावणारा आहे. कारण सेंट फ्रान्सिस झेव्हियर हे आता केवळ एका धर्माचे संत नाहीत. त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. ते आता ‘लोकदैवत’ बनले आहेत. त्यांच्यावर आक्षेपार्ह शेरे मारून व लोकभावना चिथावून सुभाष वेलिंगकर गोव्यात धर्मच्छल (इन्क्विझिशन) आणू पाहतायत‌ का, असा सवाल फादर व्हिक्टर फेर्रांव यांनी केला आहे.

‘गोमन्तक टीव्ही’वरील चर्चेत फा. फेर्रांव म्हणाले, सेंट फ्रान्सिस झेवियर यांना लाभलेले लोकदैवताचे स्वरूप त्यांच्याकडून काढून घेणे आता कोणालाही शक्य नाही. कारण आता ती लोकभावना बनली आहे आणि ती सर्व धर्मांत समान आहे. ती काढून परशुराम दैवताला चिकटवण्याच्या खटाटोपामागे मला दुष्ट कारस्थानाचा वास येतो आणि तिरस्काराची भावना त्याभोवती आहे, असे फा. फेर्रांव म्हणाले.

शेकडो वर्षांपूर्वी सेंट फ्रान्सिस झेवियर हे काळाशी सुसंगत वागले. त्यावेळी ती त्यांची गरज होती. कारण त्यांना ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा होता. यात अडसर होता तो नव्याने कॅथलिक झालेले गोवेकर, मुसलमान आणि कॅथलिक बनून पूर्वीचेच‌ धर्माचरण करणाऱ्या ज्यू लोकांचा. या लोकांना शोधून काढण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे होते. त्यावेळी इन्क्विझिशनचा गोव्यातील कॅथलिकांना प्रचंड त्रास झाला. त्यांच्या जखमा अजून भरून निघालेल्या नाहीत. आमच्या पूर्वजांनी हा त्रास सहन केलेला आहे. मलाही त्यांनी केलेले इन्क्विझिशन योग्य वाटत नाही. मात्र, या त्या काळातील गोष्टी आहेत. आता त्या उपस्थित करून धर्मतेढ उत्पन्न करण्यात अर्थ नाही. आज त्या इतिहासाचे दाखले देत हिंदूंना कट्टरवादी बनवून सुभाष वेलिंगकर यांना दुसरे राजकीय इन्क्विझिशन आणायचे आहे का, असा सवाल फा. व्हिक्टर फेर्रांव यांनी उपस्थित केला

सुभाष वेलिंगकर यांनी जी काही वक्तव्ये केली आहेत, त्यामुळे गोव्यात धार्मिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. आता वेलिंगकरांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही काही ख्रिस्ती बांधवांनी केली आहे. यामध्ये काही आमदारही आहेत. माजी आमदार मिकी पाशेको यांनी तर पोलिस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे.

सुभाष वेलिंगकर यांनी आपल्या विधानात म्हटले आहे, की ‘सेंट फ्रान्सिस झेवियर हे कधीच ‘गोंयचो सायब’ होऊ शकत नाहीत. तो मान परशुरामांना जातो’. वेलिंगकरांनी असेही म्हटले आहे की, ‘इन्क्विझिशन ही संस्था गोव्यात आणण्यास सेंट फ्रान्सिस झेवियर हे जबाबदार होते.’ शेकडो वर्षांपूर्वीच्या अत्याचाराची माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी वेलिंगकर 3 मे पासून 22 दिवसांची यात्रा काढणार आहेत.

‘गोमन्तक टीव्ही’वरील चर्चेत फादर व्हिक्टर फेर्राव म्हणाले की, ‘गोंयचो सायब’ हा शब्द देशी भाषेतला नाही. तो आहे फारशी. त्यांना परशुरामाचा गौरव करण्यासाठी दुसरा शब्द सापडला नाही का? हे वेलिंगकरांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे, असा आरोप फेर्राव यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT