OBC Federation  Dainik Gomantak
गोवा

Goa OBC Federation: एकसंध होताच ओबीसींच्या मागण्या मान्य होतील; सहकारमंत्री शिरोडकर यांचे प्रतिपादन

OBC Federation Of Goa: ओबीसींच्या अठरा जातींचे प्रतिनिधी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते

गोमन्तक डिजिटल टीम

Bindeshwari Prasad Mandal Jayanti

पणजी: कला आणि संस्कृती रक्षणासाठी बहुजन समाजाचे मोलाचे योगदान असून अशा समाजाला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी इतरांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट मत सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.

पर्वरी येथील क्षात्रतेज सभागृहात रविवारी (ता.२५) राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे बिंदेश्‍वरीप्रसाद मंडल यांची १०६वी जयंती ओबीसी बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष शिरोडकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, एससीएसटी आयोगाचे अध्यक्ष दीपक करमरकर तसेच ओबीसी महासंघाचे गोवा राज्य अध्यक्ष मधू नाईक, कार्याध्यक्ष पद्मनाभ आमोणकर, सचिव सर्वेश बांदोडकर, प्रमुख वक्ते पत्रकार प्रभाकर ढगे तसेच इतर सर्व जातींचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मधू नाईक यांनी राज्यातील ओबीसी बांधवांनी एकजुटीने समोर येण्याची आवश्‍यकता व्यक्त केली आणि ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्याकडे सुपुर्द केले. या कार्यक्रमात ओबीसी महासंघाचे संकेतस्थळ तसेच ई-पेपरचे उद्‌घाटन करण्यात आले.

दरम्यान या कार्यक्रमाला राज्यभरातील ओबीसींनी लक्षणीय उपस्थिती लावली. ओबीसींसोबतच एससी आणि एसटी बांधवांनीही मेळाव्याला सहकार्य केले. ओबीसींच्या अठरा जातींचे प्रतिनिधी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आणि आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सर्वांनी यावेळी एकजूट दाखविली.

बी.पी. मंडल यांनी ओबीसींना मानाने जगण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले, अशा महान व्यक्तीचा जयंती सोहळा राज्याच्या बाराही तालुक्यांत व्हावा. बहुजन समाजाचा आवाज आज बुलंद होण्याची आवश्‍यकता असून एकसंध होताच ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य होतील.
सुभाष शिरोडकर, सहकारमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT