Subhash Shirodkar  Dainik Gomantak
गोवा

Shiroda: शिरोडा मतदारसंघात राजकीय पटलावर हालचाली! महादेव नाईक, अभय प्रभू यांची तयारी सुरू, काँग्रेसच्‍या गोटात शुकशुकाट

Shiroda Constituency Politics: जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. त्‍यांच्‍या योगदानाचा त्‍यांना पुढील निवडणुकीत नक्‍कीच लाभ होईल.

Sameer Panditrao

फोंडा: मंत्री सुभाष शिरोडकर काँग्रेसमध्ये असताना शिरोडा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जायचा. पण, सुभाष यांनी काँग्रेस सोडल्यानंतर या पक्षाला गळती लागली असून, सध्या तेथे काँग्रेसला कोणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोंड्याप्रमाणे तेथे जोरदार पडसाद उमटत नसले तरी पडद्यामागे अनेक हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहेत.

मागच्या खेपेला येथे प्रामुख्याने लढत होती ती भाजपचे सुभाष शिरोडकर व ‘आम आदमी’चे महादेव नाईक यांच्यात. त्‍या निवडणुकीत सुभाष यांना ८,३०७ मते तर महादेव यांना ६१३३ मते प्राप्त झाली. महादेव नाईक हे आम आदमी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले.

यावेळी आरजीचे शैलेश नाईक यांनी ५०३६ मते मिळवली. मात्र, काँग्रेसचे तुकाराम बोरकर यांना फक्त १,९५३ मते मिळाल्यामुळे ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले होते. मगोच्या संकेत मुळे यांना २३९७ मते मिळाल्यामुळे त्‍यांना चौथा क्रमांक प्राप्त झाला होता.

आता महादेव नाईक, अभय प्रभू हेही यावेळी नशीब अजमावू शकतात. त्यांनी सुभाष विरोधात निवडणूक लढवून जवळजवळ सहा हजार मते प्राप्त केली होती. मात्र, असे असूनही २०२२ साली मगो पक्षाने त्यांचा पत्ता कट करून उमेदवारी संकेत मुळे यांना दिली होती. आता ते रिंगणात उतरल्यास शिरोडा मतदारसंघात अटीतटीची तिरंगी लढत होऊ शकते.

कार्यकर्त्यांचा आग्रह, अभय प्रभू

यावेळी निवडणूक लढवावी, असा आपल्याला कार्यकर्त्यांचा आग्रह होत असून, त्यामुळे आपण आगामी निवडणूक लढविण्याचे ठरवले असल्याचे मगो नेते तथा माजी आमदार कै. बाबय प्रभू यांचे पुत्र अभय प्रभू यांनी सांगितले. २०१७ साली चांगली मते प्राप्त होऊन सुद्धा आपण पुढील निवडणूक रिंगणात उतरू शकलो नाही, असे सांगून यावेळी मात्र पूर्ण शक्तीनिशी रिंगणात उतरणार, असा निर्धार व्यक्त केला.

मंत्री शिरोडकरांचे योगदान

जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. त्‍यांच्‍या योगदानाचा त्‍यांना पुढील निवडणुकीत नक्‍कीच लाभ होईल. त्‍याचे समर्थकही मोठ्या संख्‍येने आहेत.

‘आरजी’कडेही लक्ष

शिरोडा मतदारसंघात बोरी, शिरोडा, पंचवाडी व बेतोडा -निरंकाल या चार पंचायती येत असून प्रत्येक पंचायतीची भौगोलिक रचना वेगवेगळी आहे. शिरोडा मतदारसंघातून तब्बल आठ वेळा निवडून आलेले सुभाष शिरोडकर परत एकदा भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवू शकतात, असे चित्र सध्या तरी दिसते आहे. गेल्यावेळी लक्षणीय मते प्राप्त केलेल्या आरजी पक्षाची भूमिका मात्र अजून स्पष्ट झाली नसली तरी ऐनवेळी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात, असा होरा व्यक्त केला जात आहे.

नवा चेहरा, शिवप्रसाद शिरोडकर

शिवप्रसाद शिरोडकरसारखे काही नवीन चेहरेही समाजकार्याचा आसरा घेत निवडणुकीचा दरवाजा ठोठावताना दिसतात. त्यांनी रुग्णवाहिका सेवा सुरू केली असून आपले कार्यालयही थाटले आहे. काँग्रेसमध्ये सध्या ‘ठंडा, ठंडा, कूल कूल’ असे वातावरण आहे. भाजप मगो युती होते की काय यावरही अनेक समीकरणे अवलंबून असणार आहेत. एकंदरीत शिरोडा मतदारसंघातही निवडणुकीचे वातावरण तयार व्हायला लागले असून जसे जसे दिवस जवळ येतील तसे तसे या वातावरणात खुमार निर्माण व्हायला लागेल एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Gujarat ATS Foils Terror Plot: मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये शस्त्रसाठ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या; दहशतवादी नेटवर्क हादरले VIDEO

मासेविक्री बाजाराची दुरवस्था कायम, माशांच्या तुटवड्याने दर गगनाला भिडले; विक्रेत्यांचा SGPDA वर संताप

CM सावंतांच्या हस्ते Ironman 70.3 चा शुभारंभ! तेजस्वी सूर्या, अन्नामलाई, सैयामी खेर यांच्यासह 31 देशांतील 1300 ॲथलीट्सची उपस्थिती

Kidney Disease: चिंताजनक! किडनी विकारात भारत जगात दुसऱ्या स्थानी, 13.8 कोटी लोक प्रभावित; लॅन्सेटच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT