Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Subhash Phaldesai Delhi Meeting: सुभाष फळदेसाईंची दिल्लीत 'वज्रमूठ'; भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी गोव्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

Minister Subhash Phaldesai Delhi Meeting: समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी नवी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन व राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी नवी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन व राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील सामाजिक कल्याणाच्या योजना, संघटनात्मक विषय तसेच गोव्याच्या विकासाशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. फळदेसाई हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून विविध घटकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचविण्यासोबतच पक्षाच्या संघटनात्मक कामातही फळदेसाई सक्रिय आहेत. राष्ट्रीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेत गोव्याशी संबंधित प्रश्नांना त्यांनी स्थान दिल्याचे सांगण्यात येते. या भेटीमुळे फळदेसाई यांचे पक्षातील वाढते राजकीय महत्त्व अधोरेखित झाल्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT