Subhash Faldesai Dainik Gomantak
गोवा

सुदिन ढवळीकरांनी ‘त्या’ जागांची माहिती द्यावी!

पुरातत्त्व खाते करील सर्वेक्षण; मंत्री सुभाष फळदेसाई यांचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : ज्ञानवापी मशिदीनंतर आता राज्यातही काही ठिकाणी अवशेष सापडू शकतात, अशी माहिती देत अशा जागांच्या सर्वेक्षणाची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. मात्र, अशा काही जागांची माहिती असल्यास ती पुरातत्व खात्याकडे सादर करावी. खाते या जागांचे सर्वेक्षण करू शकते, अशी माहिती आज पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

सध्या देशभर उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची चर्चा सुरू आहे. याबाबत गोव्याचे वीजमंत्री आणि मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांना पत्रकारांनी विचारले असता, राज्याच्या इतिहासामध्ये धार्मिक स्थळांची पाडापाडी आणि धर्मांतर झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील घटनेप्रमाणे राज्यातील काही ठिकाणी सर्वेक्षणाची आवश्‍यकता आहे, अशी मागणी धार्मिक संत, भक्तजन, कुळावी, संस्थान पदाधिकारी यांची आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून त्यांना आवश्‍यक वाटत असल्यास सर्वेक्षण करावे, असे मत व्यक्त केले होते.

दरम्यान जर राज्यातील अशा काही जागा मंत्री सुदिन ढवळीकर यांना माहीत असतील तर त्यांनी त्याची सविस्तर माहिती राज्याच्या पुरातत्व खात्याकडे सादर करावी. पुरातत्व खाते संबंधित जागांचे सर्वेक्षण करेल, असं आश्वासन पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिलं आहे. त्यामुळे ढवळीकरांच्या वक्तव्यानंतर आता गोव्यातही हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT