Sanguem ST reserved constituency Dainik Gomantak
गोवा

संतापाची धार बोथट, बंडही शांत; भाजप मुख्यालयातील बैठकीनंतर फळदेसाई समर्थकांची नाराजी शमली

Sanguem ST reserved constituency: सांगे मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित होण्याच्या शक्यतेने आक्रमक झालेले समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे समर्थक २४ तासांत शांत झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सांगे मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित होण्याच्या शक्यतेने आक्रमक झालेले समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे समर्थक २४ तासांत शांत झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा चमत्कार झाला.

अनुसूचित जमातीसाठी सांगे विधानसभा मतदारसंघ आरक्षित होण्याची शक्यता गृहीत धरून समाज कल्याण मंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी शेजारील कुडचडे मतदारसंघाची चाचपणी सुरू केल्याने सांगे भाजपमध्ये निर्माण झालेली धुसफूस पक्षाच्या व्यासपीठावर पोहोचली.

फळदेसाई यांच्या या हालचालींना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी अखेर सांगेतील प्रमुख कार्यकर्त्यांना पणजीतील भाजप मुख्यालयात पाचारण करून त्यांच्या नाराजीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

सांगे मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव होण्याच्या शक्यतेमुळे आमदार सुभाष फळदेसाई यांनी कुडचडे मतदारसंघाची चाचपणी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. पक्ष संघटनेला विश्वासात न घेतल्याचा आरोप करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांच्या इशाऱ्यानंतर कार्यकर्त्यांनी फळदेसाई यांची भेट घेऊन ‘सांगे सोडू देणार नाही’ अशी ठाम भूमिका मांडली.

परिस्थिती चिघळू नये आणि कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना पणजीतील भाजप मुख्यालयात बोलावण्यात आले. दरम्‍यान, सध्या तरी सांगेतील नाराजी शमविण्याचा प्रयत्न झाला असला तरी मतदारसंघ आरक्षणाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर फळदेसाईंच्या राजकीय वाटचालीचा प्रश्‍‍न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

मुख्‍यमंत्र्यांची शिष्‍टाई फळाला ; समर्थकांच्या शंकांचे निरसन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगेतील कार्यकर्त्यांच्या भावना आणि पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली.

२ बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी फळदेसाई हे भाजपचे नेते असून त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.

३ मतदारसंघ आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतरच पुढील राजकीय समीकरणे ठरविली जातील, असे संकेत त्यांनी दिले. फळदेसाई यांनीही पक्षाविरोधात जाण्याचा प्रश्‍‍न नसल्याचे स्पष्ट केले.

मी पक्षाविरोधात जाणार नाही : सुभाष फळदेसाई

‘एसटींसाठी सांगे आरक्षित झाल्यास त्या मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारासाठी मी काम करीन. पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारेन. आजचा प्रश्‍‍न माझ्याबाबत नव्हता. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनातील चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांचे समाधान करण्यासाठी आम्हाला येथे बोलावण्यात आले होते’, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: सिद्धी योग अन् पुष्य नक्षत्राचा महासंयोग; मंगळवारी 'या' राशींवर महादेवाची विशेष कृपा; व्यवसाय, नोकरी आणि पैशांच्या बाबतीत मिळणार लाभ

Snake Viral Video: आरशावर उडाली विषाची कारंजी, स्वतःच्याच सावलीशी भिडला साप; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Surya Ketu Yuti 2026: सूर्याचं राशी परिवर्तन अन् केतुचा महासंगम! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

Indian Boxer: 'मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...', भारतीय बॉक्सरनं सांगितला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा; PM मोदीही हसून-हसून लोटपोट

संसदेत राडा! महिला खासदारानं पंतप्रधानांवर फेकली अंडी; म्हणाली, "तुम्हाला लाज वाटली पाहिजे..." Watch Video

SCROLL FOR NEXT