Vasco News Dainik Gomantak
गोवा

Road Safety Seminar at School: रस्ते अपघात रोखण्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे होणार प्रबोधन

लहान वयात वाहतूक नियमांचे मार्गदर्शन लाभल्यास भविष्यात नक्कीच उपयोग होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

Road Safety Awareness Seminar at School in Goa: गोव्यात वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी शालेय पातळीवरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांबरोबर पालकांचेही सहकार्य मिळणे तेवढेच महत्वाचे आहे.

भविष्याचा विचार केल्यास प्रत्येक शैक्षणिक संस्थेत वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण पुरविणे, आजच्या युगात अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी केले.

वास्को बायणा येथील चौगुले शैक्षणिक संस्थेच्या - सेट जोसेफ संस्थेच्या प्राथमिक विद्यालयात वाहतूक नियमाविषयी जागृती अभियान राबविण्यात आले होते.

यावेळी वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन कसे करावे, यांची माहिती दिली.

याप्रसंगी त्याच्या समवेत मुख्याध्यापिका आशा केणी, शिक्षिका सुमंगली प्रल्हाद, सुनिता तावरी, आशा खुशवा, वाहतुक पोलिस शिपाई घनश्याम पालकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्याध्यापिका श्रीमती आशा केणी म्हणाल्या की, राज्य सरकारने वाहतूक नियमा विषयी जागृती मोहीम प्रत्येक तालुक्यातील शिक्षण संस्थेत राबविली पाहिजे.

प्राथमिक पातळीवरील विद्यार्थांना लहान वयात वाहतूक नियमांचे मार्गदर्शन लाभल्यास, याचा भविष्यात त्यांना नक्कीच उपयोग होईल.याप्रसंगी वास्को वाहतूक पोलिसातर्फे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे चित्रफीत दाखविण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ironman 70.3: मुख्यमंत्र्यांचे सचिव 'आयर्नमॅन', खडतर ट्रायथलॉनमध्ये मारली बाजी; संकेत आरसेकर यांनी पूर्ण केले तिहेरी आव्हान

'पर्यटकांना खोल्या, घरे भाड्याने देत असताना कागदपत्र तपासा'! द. गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांच्या सूचना; चोरीच्‍या घटनांमुळे प्रशासन सावध

Akshay Patra Yojana: ..आणखी 3 हजार विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’! माध्यान्ह आहाराचा मुद्दा; वाढत्‍या मागणीनंतर शिक्षण खात्‍याचा निर्णय

Curti Khandepar Panchayat: कुर्टी-खांडेपार नूतन पंचायतघराला 'रवीं'चे नाव! ग्रामसभेत ठराव एकमताने संमत

Dabolim Airport: ‘दाबोळी’ बंद करण्याचे गुदिन्होंचे प्रयत्न! विरियातोंचा आरोप; वास्कोतील उड्डाणपूल बनला कळीचा मुद्दा

SCROLL FOR NEXT